26.1 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeKhed४० वर्षांत प्रथमच दारू विक्रेत्या तिघांना कारावास

४० वर्षांत प्रथमच दारू विक्रेत्या तिघांना कारावास

दापोलीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश महाडिक यांनी तिघांना दोषी ठरवून तीन वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला आहे.

दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भिवबंदर (ता. दापोली) येथील तिघांना दापोलीच्या दिवाणी न्यायालयाने तीन वर्षांचा कारावास ठोठावला आहे. भार्गव भिकाजी मोरे, संजय विद्याधर मोरे, उद्यकांत गोपीचंद मोरे अशी तिघांची नावे आहेत. गेल्या ४० वर्षात प्रथमच दापोलीच्या न्यायालयात दारूबंदी कायद्यांतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दापोली तालुक्यातील दाभोळ सागरी पोलिस स्थानकातर्फे २०१८ साली ही कारवाई केली होती. त्यानंतर ५ वर्षे दापोलीच्या दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरू होती. दापोली तालुक्यातील भिवबंदर गावातील भार्गव भिकाजी मोरे, संजय विद्याधर मोरे आणि उद्यकांत गोपीचंद मोरे हे गावठी दारूचा धंदा करत असल्याची माहिती दाभोळ सागरी पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या कारवाईत मुद्देमालही हस्तगत करण्यात आला होता. त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ग) (एफ) (ई) ८१, ८३ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दापोलीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश महाडिक यांनी तिघांना दोषी ठरवून तीन वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे ड. के. व्ही. लिमये यांनी बाजू मांडली. तपासिक अधिकारी म्हणून दीपक कदम, प्रभारी अधिकारी तुषार पाचपुते, पैरवी अंमलदार नीलिमा देशमुख यांनी काम पाहिले. दारूबंदी कायद्यांतर्गत आरोपींना शिक्षा देण्याचा निर्णय ४० वर्षात प्रथमच दापोली दिवाणी न्यायालयाने दिला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular