28.9 C
Ratnagiri
Sunday, February 5, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeDapoliपर्यटकांसाठी “या” अवघड वळणावर संरक्षक कठड्याची मागणी

पर्यटकांसाठी “या” अवघड वळणावर संरक्षक कठड्याची मागणी

दापोली तालुक्यातील आंजर्ले आडे-पाडले केळशी मार्गावर पर्यटकांची गर्दी वाढत चालली असून, आंजर्ले सावणे येथे असणाऱ्या अवघड वळणावर रस्त्याला संरक्षक कठड्याची आवश्यकता आहे.

कोकणात कायमच पर्यटकांची मांदियाळी असते. त्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्यामुळे इथे पर्यटन व्यवसाय आणि इतर जोड व्यवसाय देखील चालण्यास योग्य वातावरण आहे. जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पर्यटन व्यवसायात वाढ झाली असून, आंजर्ले-पाडले या दोन गावांना जोडणारा रस्ता हा दापोली तालुका ठिकाणापासून सुरू होतो तो हर्णै आंजर्ले-पाडले, आडे उटंबरकडून केळशी गावाकडे जातो. या मार्गावर खूप पर्यटनस्थळे आहेत. याच मार्गावर हर्णै मच्छीमारी बंदर देखील आहे, तसेच केळशी, आडे, आंजर्ले ही व्यापारी केंद्रे आहेत. त्यामुळे हा मार्ग सर्व तर्हेने सोयीस्कर असून त्याला अनन्य साधारण महत्व आहे.

दापोली तालुक्यातील आंजर्ले आडे-पाडले केळशी मार्गावर पर्यटकांची गर्दी वाढत चालली असून, आंजर्ले सावणे येथे असणाऱ्या अवघड वळणावर रस्त्याला संरक्षक कठड्याची आवश्यकता आहे. नाहीतर अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हि गरजेची माहिती असून देखील, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.

आंजर्ले सावणे हा भाग सध्या चांगलाच प्रसिद्धीला येत असून,  येथे स्वच्छ, सुंदर समुद्र किनारपट्टी असल्याने सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत पर्यटक येथे निवांतपणासाठी येऊन बसतात. याच मार्गाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुप्रसिद्ध आंजर्लेतील कड्यावरचा गणपती, केळशीची श्री महालक्ष्मी, उटंबर डायरा येथील याकुबबाबा सरवरी दर्गा, केळशी येथील वाळूची टेकडी, पाडले येथील परशुराम मंदिर, उटंबर येथील बेलेश्वर मंदिर, आंबवली बुद्रुक येथील श्री विश्वेश्वर मंदिर आदी देवस्थानांसह विविध प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यामुळे ती पाहण्यासाठी पर्यटकांची या मार्गावर सतत ये-जा असते.

शिवाय दररोज हर्णै बंदरावर येथे आडे, उटंबर, केळशी दालदीवाडा येथील मच्छीमार व्यवसायानिमित्त एकमेव मार्गाने प्रवास करत असतात. सुरुवातीला रस्त्याच्या दुतर्फा गर्द झाडी होती; मात्र रस्त्याच्या सुधारणावेळी झाडी पूर्णपणे तोडण्यात आली आहेत. या अवघड वळणावर संरक्षक कठड्याची गरज असून तो लवकरात लवकर बांधण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular