सोनुर्ली रोणापाल हद्दीवरील जंगल परिसरात निर्जनस्थळी एक विदेशी महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या जंगलात गुरे चरावयास नेणाऱ्या गुराख्याने तिला पाहिले त्याने तातडीने ही खबर गावात दिली आणि तपास सुरू झाला. ती तीन चार दिवस उपाशी असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान तिला बांधून ठेवल्याने पायाला जखम झाली आहे. ती इंग्रजी भाषेत बोलत आहे. त्यामुळे ती यूएसएमधील असावी आणि तामिळनाडूमधील नवरा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलीसांनी घटनास्थळी येत ही महिला शनिवारी सकाळी एका त्यानंतर याबाबत पोलीसांना माहिती बांधुन ठेवलेल्या साखळदंडातून सुटका करून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिच्या उजव्या पायाला साखळदंड घालून एका झाडाच्या बुंध्याला कुलुपबंद करण्यात आले होते. सलग तीन दिवस ती याच अवस्थेत होती. उपाशी राहिल्याने ती महिला बोलण्यांच्या स्थितीत नव्हती. जंगलात सोनुर्लीतील काहीजण गुरे चालण्यासाठी गेले असता या महिलेचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. दरम्यान, तिच्या पतीकडून, हा प्रकार घडला असावा असा अंदाज सावंतवाडी पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सद्यस्थितीत या महिलेवर की उपजिल्हा रुग्णालयात असून तिची प्रकृती पाचे सांगण्यात आले. सुभारत मात्र, ती काही बोलू शकल्यान पुळे अधिक तपास करण येत असल्याचे पोलीसांनी सांगितले. तसेच अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येणार आहे असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हवाला देत पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले. या महिलेकडे सापडलेल्या कागदपत्रावरून संबंधित महिलेचे नाव ललिता कायी कुमार एस वय ४९ असून ती तामिळनाडूमधील रहिवासी आहे. ती मूळ अमेरिकन नागरिक असल्याचे देखील उघड झाले आहे.
मात्र ती स्पष्टपणे बोलायला लागल्यावर माहिती मिळेल असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज तिच्याशी बोलता येणार नाही, तिच्यावर उपचार सुरू आहेत असे म्हटले आहे. मडुरा रेल्वे स्थानक घटनास्थळापासून १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. या ठिकाणांहून निर्जनस्थळी जाण्याची वायवाट जंगलातून जाते. या महिलेला जंगलात बांधुन ठेवणारी ती व्यक्ती कोण? याचा पोलीस शोध घेत आहेत. तिच्या सोबत आधारकार्ड, इंग्लिश भाषेतील चिठ्ठी व पैसा आदी साहित्य आढळून आले ते पोलिसांनी जप्त केले आहे..