ठाकरे गटाच्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. ठाकरे गटाचे माजी मंत्री, रत्नागिरीचे माजी पालकमंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून पाच तास चौकशी करण्यात आली आहे. ५०० कोटींच्या भूखंड घोटाळ्या प्रकरणी ही कारवाई सुरु आहे. रवींद्र वायकर यांनी मुंबई महापालिकेची दोन लाख वर्ग फूट जमिनीवर अनधिकृत कब्जा केला असून तिथे ५०० कोटींचं पंचतारांकित रबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल उभारलं जात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
रवींद्र वायकर यांनी मातोश्री स्पोर्टस ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेले खुले क्रीडांगण व गार्डनसाठी असलेल्या जागेवर रवींद्र वायकर यांनी अनधिकृत कब्जा केला, असाही त्यांच्यावर आरोप सोमय्या यांनी केला होता. याच प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे.