31.3 C
Ratnagiri
Friday, May 24, 2024

विनाकारण त्रास द्याल तर गप्प बसणार नाही आ. अनिल परबांचा इशारा

विनाकारण त्रास द्याल, खोटे गुन्हे दाखल कराल...

रत्नागिरीजवळ अपघात रिक्षाचालकाचा मृत्यू

रिक्षाचे ब्रेक निकामी झाल्याने रिक्षा पलटी होऊन...

दापोलीतील महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले, नातेवाईकांना घातपाताचा दाट संशय

तालुक्यातील वणंद येथील ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे...
HomeKhedबोरज शिवफाटा येथील प्रकार, महामार्गावर चार किलो गांजा जप्त

बोरज शिवफाटा येथील प्रकार, महामार्गावर चार किलो गांजा जप्त

पुणे-स्वारगेट येथून एकाकडून गांजा खरेदी करून विक्रीसाठी हे त्रिकूट आले होते.

मुंबई-गोवा महामार्गावरील बोरज शिवफाटानजीक ८० हजार रुपये किमतीचा ४ किलो गांजा जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने काल (ता. ४) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. या प्रकरणी दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. कारवाईमुळे अंमली पदार्थांचे पुणे-खेड असे नवे कनेक्शन उजेडात आले आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली. मोहन शिवशंकर कुशवाहा (वय २२, रा. खेर्डी, चिपळूण), शुभम संतोष गमरे (वय २३, लोटे घाणेखुंट, खडे), सचिन रामसहजीवन चौहान (वय २० रा, असगनी, खेड) अशी अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.

पुणे-स्वारगेट येथून एकाकडून गांजा खरेदी करून विक्रीसाठी हे त्रिकूट आले होते. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून बोरज शिवफाटा येथे ही कारवाई केली. तीन संशयितांकडून गांजासह १ लाख ४८ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये ४० हजार २२० एक खाकी पॅकेट आहे. त्यामध्ये २.०११ किलोग्रॅम वजनाचा गांजा अमली पदार्थ, एक काळ्या रंगाची सॅक बॅग, ३८ हजार ८६० रुपयांचे एक खाकी चिकटपट्टीने गुंडाळून आणलेले पॅकेट, त्यामध्ये १.९४३ किलोग्रॅम वजनाचा गांजा, चार मोबाईल, ५० हजारांची एक काळ्या रंगाची मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे प्रशांत बोरकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव, बोरकर, हवालदार सुभाष भागणे, शांताराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकर, दत्तात्रय कांबळे, अतुल कांबळे, श्वानपथकाचे अधिकारी सूरज भोळे, पाचवे, घुगरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES

Most Popular