24.6 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeRatnagiriगणेशभक्तांसाठी १० मेपासून कोकण रेल्वेचे आरक्षण खुले

गणेशभक्तांसाठी १० मेपासून कोकण रेल्वेचे आरक्षण खुले

१० मे पासून गणेशोत्सवात धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण खुले होणार आहे.

यंदा ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. कोकण मार्गावर सोडण्यात येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण १२० दिवस आधी म्हणजेच १० मे पासून खुले होणार असल्याने गणेशभक्त कमालीचे सुखावले आहेत. नियमित रेल्वेगाड्यांसह ‘गणपती स्पेशल गाड्यांची आरक्षित तिकिटे मिळवण्यासाठी तिकीट खिडक्यांवर चढाओढच सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात डेरेदाखल होतात. कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे बुकिंग २ ते ३ मिनिटातच हाऊसफुल्ल होत असल्याने आरक्षित तिकिटांसाठी तिकीट खिडक्यांवर तासन्तास ताटकळत उभे राहूनही चाकरमान्यांच्या पदरी निराशाच पडते.

यंदा ७ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे. गणेशोत्सव कालावधीत कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त सोडण्यात येणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांची आरक्षित तिकिटासाठी ऑनलाईनप्रमाणेच तिकीट खिडक्यांवरही गर्दी उसळणार आहे. कोकण मार्गावर नेमक्या किती गणपती स्पेशल चालवणार, हे अद्याप रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेले नाही; मात्र, १० मे पासून गणेशोत्सवात धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण खुले होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांना गणपतीसाठी गावी येण्याचे नियोजन करणे सुकर होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular