28.6 C
Ratnagiri
Sunday, February 22, 2026

कोकणात १९८ जादा फेऱ्यांचे नियोजन शिमगोत्सव, होळीसाठी ‘लालपरी’ सज्ज

मुंबई, ठाणे परिसरात स्थायिक झालेल्या कोकणी बांधवांना...

रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार ९.५ कोटींची ‘स्किल लॅब’

राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि भावी...
HomeRatnagiriलांजातील चार गावांना वादळी पावसाचा तडाखा

लांजातील चार गावांना वादळी पावसाचा तडाखा

आंबा, काजूच्या फांद्याही मोडून नुकसान झाले आहे.

महाशिवरात्रीनंतर थंडी गायब होऊन तापमानात वाढ झाली आहे. दुपारी उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असतानाच शनिवारी (ता. २१) दुपारी अचानक लांजा तालुक्यातील आरगाव, रिंगणे, कोंडगे, व्हेळ गावांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. अर्धा तास पडलेल्या पावसाने उकाड्यातून दिलासा मिळाला. ग्रामस्थ, विद्यार्थी, महिलांची पावसाने तारांबळ उडाली. आंबा आणि काजूपिकाला याचा मोठा फटका बसेल, असा अंदाज बागायतदारांनी वर्तवला आहे. या पावसाने केळी आडव्या झाल्या असून आंबा, काजूच्या फांद्याही मोडून नुकसान झाले आहे. यावर्षी पाऊस ऑक्टोबरपर्यंत पडत होता. त्यामुळे कापणी, झोडणीची कामे लांबली. त्यानंतर थंडीला सुरुवात झाल्याने आंबा, काजूला मोहोर येऊन आता उत्पादन सुरू झाले आहे; परंतु शनिवारी दुपारी कुठलीही चिन्हे नसताना अचानक लांजा तालुक्यातील आरगाव, व्हेळ, कुरंग, रिंगणे आदी गावांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

पावसासोबत जोरदार वाराही सुटला होता. उन्हाळ्यातील कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. काही ठिकाणी घरांची, लाकडे भरण्याची कामे सुरू होती. या आकस्मिक पावसाने कामर्गारांसह शेतकऱ्यांची धांदल उडाली. लाकूडफाटा सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी तारांबळ झाली. आंबा, काजूचें उत्पादन सुरू झाले आहे. ओल्या काजूगरांनाही मोठी मागणी असल्याने चांगले उत्पन्न मिळत आहे. या परिसरात काजूची मोठी लागवड झाली असून, मोठ्या प्रमाणात काजू बी धरली आहे. या पावसाने त्याला फटका बसला आहे. आंब्याच्या सुरुवातीचा मोहोर काळा पडला. आता दुसऱ्यांदा आलेल्या मोहोराला कैऱ्या लगडल्या आहेत. त्याचवेळी पाऊस पडल्याने हा आंबा आता हाती येणार नाही, याची चिंता बागायतदारांना लागली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular