20.9 C
Ratnagiri
Wednesday, January 7, 2026

मॅरेथॉन उपक्रमामध्ये मराठीचा वापर – प्रसाद देवस्थळी

कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या तिसऱ्या वर्षी मराठी भाषेचा...

कोंडगावची घंटागाडी सात महिने धूळ खात

कोंडगाव ग्रामपंचायतीला देण्यात आलेली घंटागाडी तब्बल सात...

सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघसंवर्धनाला गती…

सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी विदर्भातील ताडोबा...
HomeRatnagiriरत्नागिरी सिटी सव्र्व्हेलन्स प्रकल्पात फसवणूक

रत्नागिरी सिटी सव्र्व्हेलन्स प्रकल्पात फसवणूक

शासनाची ४३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केली.

रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाचे अत्यंत महत्त्वाचे रत्नागिरी सिटी सव्हॅलन्स प्रकल्पाचे काम दिले होते. ते पूर्ण करणे बंधनकारक असताना प्रोटोकॉल वन इट लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने काम न करता शासनाची ४३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केली. शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी कंपनीच्या दोन संशयित संचालकांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत गोपाळ थवानी व कुलदीप एराम, अशी फसवणूक करणाऱ्या संशयित संचालकांची नावे आहेत. ही घटना १७ जानेवारी २०२३ ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे शहर परिसरात उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे, त्याची देखभाल करणे, पुरवठा आदेशाप्रमाणे कामकाजाची पूर्तता करण्याचे काम प्रोटोकॉल वन इट लॅब्स कंपनीकडे होते.

मात्र, कंपनीचे संचालक हेमंत थवानी व कुलदीप एराम यांनी अटी शर्थीचा भंग करून शासनाची ४३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक, पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग पोलिस अधीक्षक कार्यालयाचे उमेश आव्हाड (रा. शंकेश्वर मधुबन हाऊसिंग सोसायटी माळनाका, रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी कंपनीचे संचालक संशयित हेमंत थवानी व कुलदीप एराम यांच्याविरुद्ध शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular