26.2 C
Ratnagiri
Saturday, April 19, 2025

विद्यार्थ्यांच्या शोधात जिल्हा परिषदेचे शिक्षक घरोघरी

नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश...

जिल्हावासीयांचे १२३ प्रश्न निकाली – पालकमंत्री उदय सामंत

रस्त्यांचे डांबरीकरण होत नाही, साकव नाही, जागेचा...

प्रस्तावित ८४ लघुउद्योगतून रोजगारनिर्मिती सोवेली औद्योगिक वसाहत

मंडणगड तालुक्यातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध...
HomeChiplunचिपळुणात जमीन खरेदी व्यवहारात लाखोंची फसवणूक

चिपळुणात जमीन खरेदी व्यवहारात लाखोंची फसवणूक

रोख रक्कम १४ लाख ८२ हजार ३०० रुपये अदा केले होते.

चिपळूण तालुक्यात जमीन खरेदीच्या व्यवहारात तब्बल १४ लाख ८२ हजार ३०० रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विजय वसंत पाथरवट (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पंकज रजनीकांत खेडेकर (वय ४१) आणि त्याचा भाऊ प्रितम रजनीकांत खेडेकर यांच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीसांनी पंत्रकारांना दिली. पोलीसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार, याप्रकरणी मंगळवार १८ मार्च २०२५ रोजी रात्री उशीरा गुन्हा रजिस्टर क्रमांक ६४/२०२५ अंतर्गत भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३१८ (४) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. विजय पाथरवट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी संशयित आरोपी पंकज रजनीकांत खेडेकर याच्याकडून चिंचघरी (ता. चिपळूण) येथील गट क्रमांक ४५१ आणि ग्रामपंचायत घर क्रमांक ६४० ही मिळकत खरेदी करण्यासाठी करार केला होता.

या व्यवहारासाठी त्यांनी २० सप्टेंबर २०२२ पासून आजपर्यंतच्या कालावधीत संशयित आरोपी पंकज खेडेकर याला रोख रक्कम, चेक आणि फोन पे द्वारे एकूण १४ लाख ८२ हजार ३०० रुपये अदा केले होते. या व्यवहाराची पूर्ण कल्पना पंकजचा भाऊ संशयित आरोपी प्रितम खेडेकर याला असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. मात्र, पंकज खेडेकर याने करारानुसार मिळकतीचा व्यवहार पूर्ण करण्याची तयारी दाखवली नाही. विजय पाथरवट यांनी वारंवार मिळकत हस्तांतरणाची मागणी केली किंवा पैसे परत मागीतले असता, पंकज आणि प्रितम खेडेकर यांनी त्यांना धमक्या. दिल्या, असा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे.

तसेच संशयित आरोपी पंकज खेडेकर याने फिर्यादींना कोणतीही पूर्वसूचना न देता आणि त्यांची परवानगी न घेता ही मिळकत परस्पर दुसऱ्या व्यक्तीला मोठ्या रक्कमेला विक्री करून मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या तक्रारीच्या आधारे चिपळूण पोलीस ठाण्यात पंकज आणि प्रितम खेडेकर या दोन्ही भावांविरुद्ध संशयित आरोपी म्हणून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular