वाशिष्ठी नदीपात्रात पोहायला गेलेल्या एका शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू ओढवला. गोवळकोट मोहल्ला येथील तलहा मन्सूर घारे (१५) असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव असल्याची माहिती पोलीसांनी पत्रकारांना दिली. पवित्र रमजान महिन्यात ही दुर्घटना घडल्याने गोवळकोट आणि आजुबाजूच्या परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गोवळकोट मोहल्ला येथील तलहा घारे व त्याचे अन्य चार मित्र पोहण्यासाठी वाशिष्ठी नदीपात्रामध्ये गेले होते. उकाड्यामुळे हैराण झालेल्या या मुलांनी वाशिष्ठीत मनसोक्त पोहण्याचा बेत केला होता. त्यानुसार सायंकाळी ते वाशिष्ठी नदीपात्रात उतरले. मात्र, यावेळी वाशिष्ठी नदीच्या उधाणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तलहा हा शाळकरी मुलगा नदीपात्रात बुडू लागला. आपला माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
गोवळकोट मोहल्ला येथील तलहा घारे व त्याचे अन्य चार मित्र पोहण्यासाठी वाशिष्ठी नदीपात्रामध्ये गेले होते. उकाड्यामुळे हैराण झालेल्या या मुलांनी वाशिष्ठीत मनसोक्त पोहण्याचा बेत केला होता. त्यानुसार सायंकाळी ते वाशिष्ठी नदीपात्रात उतरले. मात्र, यावेळी वाशिष्ठी नदीच्या उधाणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तलहा हा शाळकरी मुलगा नदीपात्रात बुडू लागला. आपला मित्र बुडताना पाहून त्याच्यासोबत असलेले इतर मित्र त्यावेळी घाबरून गेले. त्याला वाचविण्यासाठी कोणीही जावू शकत नव्हते. अशावेळी त्या मुलांनी आरडाओरड केली व मदत मागितली.
नदीकिनारी धाव – त्यांचा आरडाओरडा ऐकताच आजूबाजूच्या नागरिकांनी नदीकिनारी धाव घेत किनाऱ्यावर असलेल्या बोटी सोडून बुडालेल्या तलहाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मच्छीमार तसेच नागरिक व अनेक तरुण देखील थेट नदीपात्रात उतरले. पट्टीचे पोहणारेही खळखळणाऱ्या पत्रात उडी घेऊन शोध घेऊ लागले. पण तलहाचा थांगपत्ता लागत नव्हता. शर्थीचे प्रयत्न सुरू होते, परंतु उधाणाची भरती अडसर ठरत होती. यावेळी शेकडो लोकं गोवळकोट येथील धक्क्यावर जमा झाले होते. सर्वजण तलहासाठी प्रार्थना करत होते. घटनेची खबर पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना देण्यात आली. तत्काळ घटनास्थळी पोलिस कर्मचारी दाखल झाले. स्थानिक बोटचालकांच्या मदतीने वाशिष्ठी नदीपात्रात मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तब्बल अर्ध्या तासानंतर त्याचा मृतदेह वाशिष्ठी नदीपात्रात आढळून आला. तो शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.