बँकेच्या पॉलिसीचे हप्ते भरण्यासाठी महिलेकडून ७५ हजार रुपये घेऊन जाऊन ते पैसे सदर महिलेच्या खात्यात न भरता फसवणूक केल्या प्रकरणी, खेड पोलिस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, खैरून्निसा इब्राहीम कादिरी रा. महाडनाका हमदुले चाळ यांचे पती कामानिमित्त परदेशात असतात. संशयित आरोपीत युनुस इब्राहीम परकार रा. शिवाजीनगर महाडनाका, खेड हा त्यांच्या शेजारी राहत असल्याने खैरूनिसा यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या आयसीएससी बँकेच्या पॉलिसीचे थकीत हप्ते भरण्यासाठी २५ हजार रुपयांचे एकूण तीन चेक असे ७५ हजार रुपये युनुस घेऊन गेला.
मात्र , खैरूनीसा यांच्या नावे आयसीएससी बँक पॉलिसीमध्ये पैसे जमा न करता त्याने ७५ हजार रुपये स्वतःच्या नावे असलेल्या बँक ऑफ बडोदा बँकेच्या खात्यावर जमा करून खैरुन्निसा यांची ७५ हजार रुपयांची फसवणूक केली.
खेड शहरातील महाडनाका येथील सुपर केमिस्ट या औषधांच्या दुकानाच्या शेजारी रहात असलेल्या युनूस इब्राहीम परकार, रा. शिवाजीनगर महाड नाका, याच्यावर महिलेच्या आयसीएससी बँकेच्या विमा पॉलिसीची रक्कम रूपये ७५ हजार रुपये असे २५ हजाराचे ३ चेक फिर्यादीच्या स्वतःच्या बडोदा बँकेच्या खात्यात जमा करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खैरूनिस्सा इब्राहीम कादीरी यांनी येथील पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे पोलिसांनी शेजारी युनुस याचा शोध घेत असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.