26.2 C
Ratnagiri
Sunday, April 20, 2025

चर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

शहरातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू...

जनता दरबारात माहिती घेऊनच या – मंत्री उदय सामंत

जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरे काही मोठे काम असू...
HomeRatnagiriजिल्ह्यातील ९० हजार महिलांना मोफत गॅस, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

जिल्ह्यातील ९० हजार महिलांना मोफत गॅस, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला लाभार्थीच्या नावे गॅसजोडणी असणे अनिवार्य आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्य उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सिलिंडरचे पुनर्भरण करणे शक्य नसल्याने अनेकांच्या गॅस शेगड्या बंद होत्या. त्यामुळे या लाभार्थ्यांना वर्षातून तीन सिलिंडर शासन भरून देणार आहे; मात्र, या लाभार्थ्यांना एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलिंडरसाठी अनुदान दिले जाणार नाही. जिल्ह्यातील ९० हजार ४५२ उज्ज्वलांना ३ मोफत गॅस मिळणार आहेत. शासन गरीब कुटुंबांना वार्षिक ३ सिलिंडरचे मोफत पुनर्भरण करून देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थीनाही मिळणार आहे.

१ जुलैला पात्र होणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका पात्र ठरणार नाहीत. जिल्ह्यात उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस जोडणी दिलेल्या ९० हजार ४५२ लाभार्थ्यांना शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे. या लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलिंडर मोफत भरून दिले जाणार आहेत. माझी लाडकी बहीण योजनेसाठी २ लाख १३ हजार ६७६ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे या योजनेच्या निकषात बसणाऱ्या पात्र महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला लाभार्थीच्या नावे गॅसजोडणी असणे अनिवार्य आहे. जोडणी नावावर असेल तरच त्या महिलेला अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळेल.

RELATED ARTICLES

Most Popular