29 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiri२१ मे पासून रत्नागिरी शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार

२१ मे पासून रत्नागिरी शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार

नवीन पाईप लाईन घातली तरीसुद्धा रत्नागिरीकरांना पाण्याच्या समस्येला समस्येला तोंड द्यावे लागतच आहे.

रत्नागिरी तालुका गेले दोन वर्षापासून सुरु असलेल्या रस्ते आणि पाण्याची पाईप लाईन दुरुस्तीच्या कामासाठी खूपच चर्चिला जात आहे. नवीन पाईप लाईन घातली तरीसुद्धा रत्नागिरीकरांना पाण्याच्या समस्येला समस्येला तोंड द्यावे लागतच आहे.

माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी पत्रकार परिषदेत रत्नागिरी शहराला आता एक  दिवसाआड पाणी पुरवठा होणार असल्याची दिली. याची अंमल बजावणी शनिवार २१ मे पासून होणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि यासाठी व्यवस्थित पाणीपुरवठा व्हावा यासाठी शहराचे दोन भाग पाडण्यात आले आहेत.

आज एक दिवसा आड पाणीपुरवठा होण्याची घोषणा झाली याचा अर्थ रत्नागिरी शहरात जनतेला आता पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे. कोट्यावधी रुपये खर्चून गाजत असलेली नवीन पाणी योजना पाच वर्ष झाली तरी देखील पूर्ण न करण्याचा अगर पाच वर्ष योजना अपूर्ण ठेवण्याचा विक्रम रत्नागिरी  शहराच्या नावावर आहे.

भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी आवाज उठवला आहे. आणि शासनाच्या बेजबाबदार कारभाराची शिक्षा जनतेने का भोगावी? नवीन पाईप लाईन निकृष्ट दर्जाची असल्याने ती वारंवार फुटत असून, हे फुकट जाणारे पाणी वाया गेलं आणि वर्षभरात अशा बेपर्वाईमुळे किती हजार लिटर पाणी फुकट गेलं याचा हिशोब कोण करणार? अनागोंदी कारभारामुळे फुकट गेलेल्या पाण्याची शिक्षा म्हणून आता होणार एक दिवसाआड पाणी पुरवठा. मात्र ही शिक्षा नगरजनांना का? त्यांचा दोष काय? मात्र मुकी जनता भरडली जाते. ही पूर्वापार सुरु असलेली प्रथा म्हणून पाणी कापतीची, पाणी टंचाई ची झळ जनतेने सोसायची.

रस्तोरस्ती हजारो लिटर पाणी फुकट जात होते. मात्र तत्कालीन जबाबदार लोकप्रतिनिधीनी हात वर करून त्याकडे स्पष्ट दुर्लक्ष करून नव्या पाणी योजनेच्या कैफात संबंधित गर्क होते. त्यांना फुकट जाणाऱ्या पाण्याची किमत नव्हती. मात्र आज याच फुकट गेलेल्या पाण्याची किमत पाणी टंचाईचा सामना करत जनतेला सोसावी लागत आहे. ही पाणी टंचाईची वेळ बेदरकार, बेजबाबदार वर्तनाचे फलित आहे अशी खरमरीत व बोचरी प्रतिक्रिया दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular