27.9 C
Ratnagiri
Monday, June 9, 2025

कोकण मार्गावर तुतारी एक्स्प्रेस चोरट्यांच्या ‘हिटलिस्ट’ वर !

कोकण मार्गावर रेल्वेगाड्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विशेषतः...

दररोज कचरा द्या, बक्षीस गुण मिळवा, चिपळूण पालिकेचा उपक्रम

शहरातील स्वच्छता आणि घनकचरा संकलन मोहिमेत चिपळूण...

गांजा प्रकरणी आणखी एकाला अटक – महाड कनेक्शन

गांजा विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मागावर येथील...
HomeEntertainment२२ ऑक्टोबरपासून नाट्यगृह, चित्रपटगृह उघडण्यास परवानगी

२२ ऑक्टोबरपासून नाट्यगृह, चित्रपटगृह उघडण्यास परवानगी

दीड वर्षानंतर अखेर नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उघडण्यात आल्याने, कलाकार पुन्हा पूर्वीच्याच जोमाने कामाला लागले आहेत.

राज्य सरकारने शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे आणि आता सांस्कृतिक कार्यक्रमाना २२ ऑक्टोबर पासून परवानगी दिल्याने, कलाकारांमध्ये एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. नाट्यगृह, चित्रपटगृह उघडण्याचा आणि इतर मोकळ्या जागेत करता येणाऱ्या महत्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, ब्रेक द चेन अंतर्गत नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

२२ ऑक्टोबरपासून राज्यभरातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे पुन्हा सुरू होणार आहेत. सोबतच यासाठीची राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे. या नव्या नियमावलीनुसार, प्रतिबंधित क्षेत्रातील नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी नाही. तसेच मास्क आणि सॅनिटासझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. कलाकार आणि कर्मचाऱ्यांनी नियमित तपासणी करणं बंधनकारक आहे. आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. तसेच, क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेचा वापर करण्याची परवानगी नाही आहे.

सर्वांना आरोग्य सेतू अॅपचा वापर बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे कलाकार आणि प्रेक्षक सर्वांचे संपूर्ण लसीकरण पूर्ण असणे बंधनकारक केले आहे. कोणालाही कलाकारांना कक्षात जाऊन भेटण्याची परवानगी नाही. केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्यांनी पीपीई कीट परिधान करणं बंधनकारक आहे. या नियमांचे पालन करणे सर्वांसाठीच बंधनकारक आहे.

दीड वर्षानंतर अखेर नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उघडण्यात आल्याने, कलाकार पुन्हा पूर्वीच्याच जोमाने कामाला लागले आहेत. पुरवी देखील कोरोना नियमांचे पालन केले जात होते परंतु, आत्ता विशेष काळजी घेण्याचे सुचविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular