25.6 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

रत्नागिरीतील जुने भाजीमार्केट पालिकेने पाडले

शहरातील धोकादायक बनलेल्या मच्छीमार्केट येथील जुनी भाजीमार्केटची...

राजापूर पोस्टातील रेल्वे आरक्षण पुन्हा सुरू…

काही तांत्रिक बिघाडामुळे गेल्या आठवडाभरापासून राजापूर पोस्ट...

सुनावणीपूर्वीच फेरसर्वेक्षणाला विरोध – शिवसेना ठाकरे गट

चिपळूण पालिकेने वाढीव घरपट्टीबाबत २८ सप्टेंबरपर्यंत हरकती...
HomeRajapurयंदापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे होणार कमी

यंदापासून विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे होणार कमी

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी यंदा सर्व विषयांचा समावेश असलेले एक पुस्तक तयार करण्यात आले आहे. एका पुस्तकामध्ये तीन महिन्यांच्या अभ्यासक्रमाचा समावेश करून अशी चार भागांची चार पुस्तके तयार केली आहेत. या पुस्तकात वह्यांची कोरी पानेही आहेत. त्यामध्ये अभ्यासक्रमांची टिप्पणी करून ठेवणे अधिक सुलभ आणि सोयीचे होईल. या साऱ्यातून विद्यार्थ्यांच्या दप्तरातील पाठ्यपुस्तकांचे ओझे कमी होणार आहे. शिक्षण विभागाने उन्हाळ्यामध्ये पाठ्यपुस्तकांच्या मागणीची नोंदणी केलेली होती. त्याप्रमाणे पुस्तके उपलब्ध झाली असून, या पुस्तकांचे शाळांमध्ये वितरणही केले आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी (ता. १५) विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पाठ्यपुस्तक पडून पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा श्रीगणेशा करता येणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून समग्र शिक्षा अभियानांतर्गत गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पुस्तके ही विषयानुसार स्वतंत्र असून, ही सर्व पुस्तके विद्यार्थ्यांना सोबत बाळगावी लागत होती. पुस्तक, वह्या यामुळे मुलांच्या दप्तराचे ओझे वाढते. यावर तोडगा काढून पुस्तकांची संख्या कमी करून वा अन्य उपाययोजना करून मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करावे, अशी मागणी पालकांकडून गेल्या काही वर्षापासून केली जात होती.

यावर्षी त्यावर उपाययोजना करून पाठ्यपुस्तकांची संख्या कमी करून दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामध्ये सर्व विषयांचा समावेश असलेले एकच पुस्तक तयार केले आहे. ज्या कालावधीतील अभ्यासक्रम सुरू तो एक पाठ्यपुस्तकांचा भाग विद्यार्थी शाळेत घेऊन येईल. अन्य तीन भाग त्या कालावधीत विद्यार्थ्याला घरी ठेवता येणार. आहेत. पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांवर विद्यार्थ्याला अभ्यासक्रमावरील विविधांगी टिप्पणी करणे अधिक सोयीचे आणि सुलभ होणार आहेत. पाठ्यपुस्तकांच्या या वर्षीच्या या नव्या स्वरूपामुळे पुस्तकांची संख्या घटल्याने या वर्षी विद्यार्थ्यांच्या – पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होईल.

RELATED ARTICLES

Most Popular