29.1 C
Ratnagiri
Sunday, February 25, 2024

बहुजनांनी ओबीसी झेंड्याखाली एकत्र यावे – चंद्रकांत बावकर

कुणबी समाजासह ओबीसी समाजाच्या विकासासाठी संघटन होण्यासह...

सहा शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार

कृषी, कृषी संलग्न क्षेत्र फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय...

रत्नागिरी ‘लायन्स क्लब’च्या डायलिसिस सेंटरचा प्रारंभ

लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट संचालित यशस्वी नेत्र रुग्णालयानंतर...
HomeRatnagiriरत्नागिरीत सार्वजनिक स्वच्छतागृहांची वाताहत

रत्नागिरीत सार्वजनिक स्वच्छतागृहांची वाताहत

पालिकेच्या शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची पुरती वाताहत झाली आहे. ‘सकाळ’च्या वाचकांनीच या अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहांची भांडाफोड केली आहे. काही स्वच्छतागृह तर बंद असल्याचे निदर्शनास आणून दिले; मात्र पालिकेने याबाबत हात वर केले असून, स्वच्छता व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालिकेची ३८ सार्वजनिक स्वच्छतागृहे सुस्थितीत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे थेट नागरिकांशी निगडित असलेल्या या प्रश्नाकडे पालिका प्रशासनाने लक्ष घालून स्वच्छतागृहांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. पालिकेला स्वच्छ भारत अभियानात देशपातळीवरील पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये सार्जजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता हा महत्वाचा भाग आहे. आता नुकताच माझी वसुंधरा अभियानांतर्गत दीड कोटीचा पुरस्कार पालिकेला मिळाला आहे.

स्वच्छतेच्या जोरावरच हे पुरस्कार पलिकाने पटकावले आहेत; मात्र पुरस्कार संपल्यानंतर या स्वच्छता मोहिमेकडे पालिकेने पाठ केली की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पालिकेची शहरामध्ये सुमारे ३८ सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. यामध्ये सुमारे २४२ सीट आहेत. पालिकेच्या बांधकाम विभागाच्या १४ कर्मचाऱ्यांकडून या स्वच्छतागृहांची साफसफाई केली जात असल्याचा दावा पालिकेने केले आहे; परंतु पालिकेचा हा दावा काही स्थानिक नागरिकांनी आणि “सकाळ”च्या खोडून काढला आहे. शहरातील काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी स्वच्छतागृहे सोडली तर बहुतांशी स्वच्छतागृहांची अक्षरशः वाताहत झाली आहे.

स्वच्छतेचे प्रतीक म्हणून पालिकेने अनेक स्वच्छतागृहे उभारली आहेत; परंतु या स्वच्छतागृहांची वेळेवर स्वच्छता होत नसल्याने स्पष्ट दिसून येते. त्यामुळे या सर्वजनिक स्वच्छतागृहाच्या इमारती शोभेच्या बाहुल्या असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अनेक स्वच्छतागृहे अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त आहेत. काही ठेकेदार पद्धतीवर चालवायला दिली असली तरी त्यांचीही अपेक्षित स्वच्छता होत नाही. मुख्य बाजारपेठेतील स्वच्छतागृहाला तर टाळेच ठोकले आहेत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील स्वच्छतागृहाची ही दशा झाली आहे. याकडे मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालून ती वेळेवर स्वच्छ करावीत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular