कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सरकारने काही निर्बंध सुरु केले आहेत, ज्यामध्ये शनिवार आणि रविवार हे दोन दिवस संपूर्ण संचारबंदी जाहीर केली आहे. बाकीचे दिवस रात्री ८ ते सकाळपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. या महिन्यात येणाऱ्या विकेंड सुट्ट्यांचे पुर्व नियोजन काही जणांनी करून ठेवले असले तरी त्याचा आत्ता काहीही उपयोग होणार नाही. कारण कोरोनाचे वाढते प्रमाण बघून सरकारला हा निर्णय घेणे भागच आहे.
रत्नागिरीमधील गणपतीपुळे या तीर्थक्षेत्रालाही या विकेंड लॉकडाऊनचा फटका बसला आहे. विकेंडला जोडून सुट्ट्या आल्यावर मोठ्या प्रमाणात कोकणाकडे अनेक भाविकांची पाऊले वळतात. कोकणाची स्वच्च आणि सुंदर किनारपट्टी कायमचं सर्वाना आकर्षित करत असते. त्यामुळे विकेंडला मोठ्या संख्येने लोकांची पहिली पसंती कोकणातील विविध पर्यटन स्थळांना असते. परंतु, सरकारने दिलेल्या नियमावलीमुळे तेथील हॉटेल तसेच मंदिरे देखील बंद ठेवण्यात आली आहेत. हॉटेलमध्ये गिऱ्हाईकचं नसल्याने कामगारांना सुद्धा झालेल्या दिवसाचा पगार देऊन घरी पाठविले गेले आहे. जर पुढे लॉकडाऊन असेच राहिले तर सर्वच व्यवसायांना झळ बसणार आहे आणि तेथे काम करणाऱ्या कामगार वर्गाला सुद्धा.
सोमवारी रात्रीपासून गणपतीपुळेमधील स्वयंभू गणपतीचे मंदिर देखील भक्तांसाठी बंद करण्यात आले आहे. काही जणांची पोट याच छोट्या हार- फुलांच्या, नारळ विक्री, ओटी खण समान याच व्यवसायावर आधारित असून, या लोकांपुढे स्वतचे आणि कुटुंबाचे गुजराण कसे करायचेहा प्रश्न आ वासून उभा आहे. मंदिर आणि शेजारील परिसरामध्ये पर्यटकचं उपलब्ध नसल्याने शुकशुकाट पसरला आहे.