26 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeKokanकोकणवासियांसाठी गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेस रवाना

कोकणवासियांसाठी गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेस रवाना

कोकणातील चाकरमान्यांना गौरी-गणपतीचा सण त्यांच्या कुटुंबियांसोबत साजरा करण्यासाठी ही विशेष गाडी सोडण्यात येत आहे.

कोकणात जाणार्‍या गणेश भक्तांसाठी मोदी एक्स्प्रेस ही विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार भाजपचे आमदार मंलगप्रभात लोढा यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर ती ट्रेन चाकरमान्यांना घेवून कोकणच्या दिशेने रवाना झाली. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आणि टाळ मृदुंग वाजवत चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेने रवाना झाले. मुंबई भाजपच्यावतीने खास मोदी एक्स्प्रेसशी व्यवस्था करण्यात आली.

दादर रेल्वे स्थानकातून मोदी एक्स्प्रेसला राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रविण दरेकर यांनी हिरवा कंदील दाखवला. मोदी एक्स्प्रेसमधून एकूण १८०० प्रवासी कोकणात गणेशोत्सवासाठी रवाना झाले. या उपक्रमासाठी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अतुल भातखळकर, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, महामंत्री संजय उपाध्याय यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या वर्षीही गणेशोत्सवात मोदी एक्सप्रेस या विशेष रेल्वेने कोकणवासीयांना गणपती उत्सवापूर्वीच सुखरुप पोहचवले होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी दादर येथून ‘मोदी एक्सप्रेस’ ला हिरवा झेंडा दाखवला होता. यावेळी मुंबई भाजपकडून ही गाडी सोडण्यात येणार आहे. या विशेष रेल्वेचा चाकरमान्यांना विशेष फायदा झाला. तळ कोकणापर्यंत चाकरमान्यांना सहज जाता यावे यासाठी एसटी महामंडळ, रेल्वे आणि खासगी वाहनांची विशेष सोय करण्यात आली आहे. त्यामुळे ताण येणार नाही आणि गणेशभक्त सुखरुप गावी पोहचणार आहेत.

मोदी एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सावंतवाडीपर्यंत जाणार आहे.ही गाडी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी स्थानकांवर थांबेल. या गाडीचा सर्व खर्च मुंबई भाजपकडून केला जाणार आहे. कोकणातील चाकरमान्यांना गौरी-गणपतीचा सण त्यांच्या कुटुंबियांसोबत साजरा करण्यासाठी ही विशेष गाडी सोडण्यात येत आहे. प्रवाशांनी मोदी एक्सप्रेसच्या सेवेबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular