25.5 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

वाहतूक कोंडीत अडकले राजापूर शहर…

दिवसागणिक वाहनांची आणि वाहने वापरणाऱ्यांची संख्या वाढत...

सवलतीच्या लाभासाठी ‘लालपरी’ला पसंती – रत्नागिरी विभाग

राज्य परिवहन महामंडळातर्फे लाडक्या लालपरीतून प्रवास करणाऱ्या...

दीड दिवसांच्या बाप्पाला भक्तांनी दिला भावपूर्ण निरोप

जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची गुरूवारी थाटामाटात सांगता...
HomeKhedलोटे औद्योगिक वसाहतीत लक्ष्मी ऑरगॅनिकमध्ये वायू गळती

लोटे औद्योगिक वसाहतीत लक्ष्मी ऑरगॅनिकमध्ये वायू गळती

या वायू गळतीमुळे धुराचे लोट उसळले.

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहती मधील लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीमध्ये शनिवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान वायुगळती झाली यामध्ये एक कामगार किरकोळ जखमी झाला असून त्याला चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वा.च्या दरम्यान कंपनीतील प्लांटमध्ये उत्पादन प्रक्रिया चालू असताना रिऍक्टर मधील तापमान वाढ़ल्याने रिअॅक्टर मधील वायू बाहेर फेकला गेला व वायू गळती झाली. या वायू गळतीमुळे धुराचे लोट उसळले. परंतु हा वायू हवेत न पसरता जमिनीवरच त्याचे विघटन झाले. कंपनी व्यवस्थापनाने तात्काळ याबाबत उपाययोजना करण्यास सुरुवात केली.

लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाचा बंब मागवण्यात आला. मात्र त्याची काही आवश्यकता भासली नाही. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने हा बंब मागवण्यात आला होता. या घटनेची खबर लागताच परिसरातील ग्रामस्थांनी कंपनीच्या आवारासमोर एकच गर्दी केली होती. लोटे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडे संपर्क केला असता वायू गळती रोखण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular