बिपरजॉय चक्रीवादळामुळे धोका निर्माण झाला असतानाच समुद्रात सुरू झालेले लाटांचे तांडव आणि उसळलेले वादळी वारे यामुळे गणपतीपुळेसह गावखडी समुद्रकिनाऱ्यावर मोठी पडझड झाली आहे. समुद्राच्या पाण्याने किनारा सोडल्याचे चित्र सध्या पहायला मिळत असून गावखडीत सुरूबनातील झाडे वादळी वाऱ्यामुळे जमिनदोस्त झाली आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसेल असा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे सर्व यंत्रणा अलर्ट आहे. हे वादळ अद्यापही समुद्रातच घोंघावत असून कोकण किनारपट्टीला असलेला संभाव्य धोका लक्षात घेऊन पुढील काही दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात यंत्रणा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत. या पार्श्वभूम वर गणपतीपुळे व गावखडी परिसरात वादळी वाऱ्याने धुमाकूळ घातला.
गणपतीपुळ्यात लाटांचे तांडव – समुद्रात सध्या लाटांचे तांडव सुरू झाले आहे. खवळलेल्या समुद्रामध्ये उसळी घेणाऱ्या लाटांनी किनारपट्टी भागाला पहिली सलामी दिली आहे. या लाटांचा तडाखा किनारपट्टी भागात दिसू लागला असून गणपतीपुळे सम ुद्रकिनारी उसळी घेणाऱ्या लाटांचा धुमाकूळ सुरू आहे.
पर्यटकांचे सामान वाहून गेले – गणपतीपुळे समुद्रातील पाण्याच्या गणपतीपुळे येथील समुद्राचे पाणी अचानक चौपाटीवरील दुकानांत शिरले यामध्ये काही पर्यटकांचे सामान वाहून गेले. दुकानांमधून काही वस्तूही वाहून गेल्या आहेत. समुद्राचे पाणी गणपतीपुळे येथील श्री गणपतीपुळे मंदिराच्या पायऱ्यांपाशी आले होते. बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीम ळे समुद्रातील अंतरप्रवाह बदलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून सम द्राला प्रचंड उधाण आहे.
किनारा सोडला – समुद्रात लाटांचे तांडव सुरू असताना पाण्याच्या पातळीतदेखील कमालीची वाढ झाली आहे. गणपतीपुळे समुद्रकिनारी समुद्राच्या पाण्याने किनारा सोडला असून गुरूवारी समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या वरील बाजूस असलेल्या काही दुकानांपर्यंत (स्टॉल्स) येऊन पोहोचले होते. उसळी घेणाऱ्या लाटा आणि घोंघावणारा वारा होता. ऊरात धडकी भरवणारा होता.
धावाधाव उडाली – अचानक लाटांचे तांडव सुरू होऊन पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर गणपतीपुळे समुद्रकिनारी साऱ्यांचीच अनेकांच्या धावाधाव उडाली. स्टॉल्सपर्यंत समुद्राचे पाणी येऊन पोहोचले होते. पाण्याची पातळी वाढताच दुकानदारांनी तेथून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा निर्णय घेऊन दुकानातील साहित्यदेखील घाबरगुंडी उडाली हलविण्याचा निर्णय घेतला होता. फयाननंतर तौक्ते चक्रीवादळाने किनारपट्टीला झोडपले होते. त्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत. त्यानंतर चिपळुणातील महापूर अंगावर काटा आणणारा होता. गुरूवारी गणपतीपुळे येथे खवळलेला समुद्र किनाराच गिळंकृत करतो की काय? अशी भीती निर्माण झाली होती. यामुळे घे साऱ्यांचीच घाबरगुंडी उडाली.
गावखडीला तडाखा – गणपतीपुळ्यासोबत गावखडीलाही त्याचा तडाखा बसल्याचे चित्र पहायला मिळाले. किनारपट्टी भागात गुरूवारी दुपारपासून उसळी घेणाऱ्या लाटांचे थैमान सुरू झाले. त्यापाठोपाठ वादळी वारे उसळू लागले होते. या वादळी वाऱ्याचा तडाखा गावखडी सुरूबनाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. येथील अनेक सुरू वृक्ष जमिनदोस्त झाले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हे वृक्ष जमिनदोस्त झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
समुद्रकिनारी पडझड – गावखडीच्या या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पडझड झाली. संरक्षक कठडा या वादळी वाऱ्यासह उसळी घेणाऱ्या लाटांनी उद्ध्वस्त झाला आहे तर समुद्रकिनारी सागरी जीवरक्षकांसाठी उभारण्यात आलेल्या मनोऱ्याचीदेखील मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
पाण्याच्या पातळीत वाढ – गणपतीपुळेसह गावखडी सम द्रकिनारी समुद्राचे तांडव साऱ्यांना पहायला मिळाले. गावखडीतदेखील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रम णात वाढ झाली होती. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर खाडीपात्रातदेखील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे खाडीतील एक जेटी पूर्णपणे पाण्याखाली आली होती.
पहाटेच्या सुमारास पाणी ओसरले – गुरूवारी दुपारपासून सुरू झालेले लाटांचे थैमान शुक्रवारी पहाटेपासून काही अंशी थांबले आहे. पाण्याच्या पातळीतदेखील घट झाली असून समुद्रकिनारीमात्र सर्वाधिक पडझड झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.