31.4 C
Ratnagiri
Wednesday, May 22, 2024

रत्नागिरी, खेड, दापोली आगारांना लवकरच मिळणार इलेक्ट्रीक बस

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, खेड, दापोली एस.टी. डेपोंना...

चिपळूणमध्ये सलग ५ दिवस पाऊस लाखोंचे नुकसान

चिपळूण शहरासह तालुक्यात सोमवारी सलग पाचव्या दिवशी...

कोकण मंडळ सलग १३ वेळा राज्यात अव्वल

बारावीच्या परीक्षेत कोकणच्या विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे सलग तेराव्या...
HomeRajapurगोवळमध्ये एकमताने ठराव मंजूर, रिफायनरी नको म्हणजे नकोच!

गोवळमध्ये एकमताने ठराव मंजूर, रिफायनरी नको म्हणजे नकोच!

राजापूरमध्ये प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा असलेला विरोध वाढतच असून शुक्रवारी ९ जून रोजी गोवळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने पुन्हा एकदा प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर केला. जवळपास एकमताने हा प्रकल्प नको अशी भूमिका स्पष्टपणे घेतली आणि ठराव मंजूर केला. रिफायनरी प्रकल्पासाठी धोपेश्वर व गोवळ या २ गावच्या जमिनी घेण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधाचा ठराव पुन्हा एकदा करण्यात आला. गोवळ ग्रामपंचायतीने याआधीदेखील प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर केला होता. धोपेश्वरमध्येही विरोधात ठराव झाला होता. शुक्रवारी बोलावलेल्या ग्रामसभेला ग्रामपंचायतीने तहसीलदार, प्रांत यांना बोलावले होते. मात्र कुणीही आले नाही अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.

पोलीस प्रशासनालादेखील या सभेबाबत पत्राद्वारे माहिती देण्यात आली होती. दीपक जोशी, संजय जाधव, संदीप मांडवकर, विश्वनाथ कदम, दीपक तांबे यांनी रिफायनरी प्रकल्पाविरोधात बाजू मांडली. तर मनोज परांजपे, बंड्या शेवडे आणि श्री. बापट यांनी समर्थन केले. त्यानंतर मतदान घेण्यात आले. जवळपास एकमताने प्रकल्पविरोधाचा ठराव मंजूर झाला. जेमतेम दोन ते तीन मते प्रकल्पाच्या बाजूने पडली. दरम्यान, यावेळी प्रशासनाने जबरदस्तीने केलेले सर्वे क्षण, दडपशाही आणि जमीन व्यवहाराबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. हे ठराव मंजूर केल्याने आता तरी सरकार या विरोधाची दखल घेईल आणि रिफायनरी प्रकल्प आणणार नाही अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular