28.6 C
Ratnagiri
Thursday, March 30, 2023
HomeSportsमॅक्सवेलच्या रिसेप्शनमध्ये भारतीय संस्कृतीचे प्रेम, विराट कोहलीचा विशेष डान्स

मॅक्सवेलच्या रिसेप्शनमध्ये भारतीय संस्कृतीचे प्रेम, विराट कोहलीचा विशेष डान्स

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेक क्रिकेटवीरांनी रिसेप्शन पार्टीत खूपच धम्माल मस्ती केली.

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल गेल्या महिन्यात २७ मार्च रोजी विनी रमनशी लग्नबंधनात अडकला. मॅक्सवेल आणि भारतीय वंशाची विनी हिने तमिळ पद्धतीने केलेल्या लग्नाला एक महिना पूर्ण झाल्याने मित्र मैत्रिणींसाठी एक खास रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. यांच्या लग्नाला काही मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळींनी हजेरी लावली होती. पण या रिसेप्शन पार्टीला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पार्टीचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएलमध्ये खेळत असलेले विदेशी खेळाडू आता भारतीय संस्कृतीच्या प्रेमात पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. बंगळुरू टीमच्या ऑलराउंडर मॅक्सवेल व पत्नी विनीची पोस्ट वेंडिग पार्टी झाली. या दरम्यान वऱ्हाडी हे भारतीय पारंपारिक पेहराव धोती कुर्ता घालून सहभागी झाले होते. सोहळ्यात नवरा-नवरी देखील पारंपरिक पोशाखात दिसून आले. या खेळाडूंचे कुटुंबीयही याच पेहरावात दिसत आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह अनेक क्रिकेटवीरांनी रिसेप्शन पार्टीत खूपच धम्माल मस्ती केली. यावेळी विराट दाक्षिणात्य पुष्पा चित्रपटातील ‘ओ अंटावा’ या गाण्यावर थिरकताना दिसला. यावेळी विराटने ब्लॅक रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजामा परिधान केला होता. या व्हिडिओतील खास म्हणजे, विराट पुष्पाच्या हिरोच्या स्टाईलमध्ये डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याशिवाय शेअर केलेल्या व्हिडिओत विराटसोबत अनेकजण धुमधडाक्यात डान्स करताना दिसले.

विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मादेखील रिसेप्शन पार्टीत क्यूट अंदाजात दिसली. अनुष्काने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘बायो-बबलमध्ये लग्नाचा कार्यक्रम!. मला बायो-बबलमध्येच सर्व कार्यक्रम आणि सण साजरे करावे असे वाटत आहे.’ असे लिहिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular