26.6 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeMaharashtraडिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर, खरे कारण आले समोर

डिसले गुरुजींचा राजीनामा नामंजूर, खरे कारण आले समोर

प्रशासकीय कारणास्तव राजीनामा मंजूर केल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा शुक्रवारी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी नामंजूर केला. प्रशासकीय कारणास्तव राजीनामा मंजूर केल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. परंतु, चौकशी समित्यांच्या अहवालात प्रतिनियुक्तीच्या काळातील त्यांची गैरहजेरी उघड झाली आहे. त्यामुळे डिसलेंवर करण्यात येणारी कारवाई प्रलंबित असल्याने राजीनामा नामंजूर करण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर डिसले गुरुजींना १७ नाव्हेंबर २०१७ ते ३१ ऑक्टोबर २०१८ या काळासाठी प्रतिनियुक्त केले. १८ डिसेंबर २०१७ रोजी त्यांना परितेवाडी शाळेतून कार्यमुक्त करण्यात आले. ५ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांनी हजर रिपोर्ट दिला, परंतु त्यावर कोणाचीही स्वाक्षरी नव्हती. शिक्षण संचालकांनी पुन्हा डिसलेंना १ नोव्हेंबर २०१८ ते ३० एप्रिल २०२० या काळासाठी पुन्हा त्याच ठिकाणी प्रतिनियुक्ती दिली. त्या काळातही ते ‘डायट’कडे फिरकलेच नाहीत. त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर तत्कालीन शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी त्यांची चौकशी केली.

चौकशी समितीने दिलेला अहवाल परिपूर्ण नसल्याने त्यावेळी डिसलेंवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. मात्र, ‘ग्लोबल’ झालेले वस्ती शाळेवरील डिसले गुरुजी अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीत, त्यांचे कॉल घेत नाहीत, असा अनुभव अनेकांना आला. त्याच्या तक्रारी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे आल्या. त्याच वेळी फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी रजा द्यावी म्हणून ग्लोबल टिचर प्रशासकीय चौकट सोडून थेट मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना भेटले. त्यावेळी त्यांना रजेचा अर्ज परिपूर्ण करून द्यावा, असे त्यांना सांगण्यात आले आणि ग्लोबल टिचर पुन्हा राज्यभर चर्चेत आले.

RELATED ARTICLES

Most Popular