27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiriगोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रवेश अर्ज १२ जूनपर्यंत ऑनलाईन

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रवेश अर्ज १२ जूनपर्यंत ऑनलाईन

गोगटे जोगळेकर ” महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे. बीए, बीकॉम, बीएस्सी, बीकॉम, (अकाउन्टिंग फायनान्स), बीएमएस,/बीएस्सी सायन्स), बीएस्सी (कॉम्प्युटर (आयटी), बीएस्सी (बायोटेक्नॉलॉजी), बीएस्सी (बायोकेमेस्ट्री), बीएस्सी (मायकोबायोलॉजी) प्रवेशअर्ज १२ जूनपर्यंत ऑनलाईन उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या वेबसाईटवर प्रवेशाची तात्पुरती नोंदणी करावी. प्रथम वर्ष बीए/ बीकॉम/ बीएस्सी या वर्गांचे प्रवेशवर्गांचे प्रवेश कायम करण्याची प्रक्रिया ६ ते १२ जून या कालावधीत सकाळी १० ते १ या वेळेत होईल. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेले प्रवेशअर्ज व ऑनलाईन नोंदणी केलेल्या प्रवेशअर्जाची छापील प्रत, बारावीचे मूळ गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला, प्रत्येकी दोन-दोन झेरॉक्स प्रती, ३ कलर फोटो जमा करून त्याचवेळी प्रवेशशुल्क भरायचे आहे. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी १९ जूनला ११ वा. लागेल. प्रवेश निश्चितचे काम २० ते २७ जूनदरम्यान होईल. त्यानंतर शिल्लक जागा असल्यास दुसरी गुणवत्ता यादी २८ जूनला सायंकाळी ७ वा. लागेल. त्यांचे प्रवेश निश्चित करण्याचे काम ३० जून ते ६ जुलै या दरम्यान होईल. त्यानंतर शिल्लक जागा असल्यास तिसरी व अंतिम गुणवत्ता यादी ६ जुलैला दुपारी ११ वा. लागेल, त्यांचे प्रवेश निश्चित करण्याचे ७ ते १० जुलैला होईल.

RELATED ARTICLES

Most Popular