काही मिनिटात सर्व गाड्यांचे आरक्षण फुल होतात म्हणजे काय? येथे दलाल दिवसरात्र तळ ठोकून असतात. त्यांना कोणीच रोखत नाही आणि हटकत देखील नाही. प्रशासनातील काही लोकांचे या दलालांशी साटेलोटे आहेत. दलाल आणि प्रशासन अशी एक साखळीच कोकण रेल्वेत कार्यरत असल्याने असे प्रकार घडत आहेत.. ही साखळीच मोडून काढली पाहिजे, उद्धवस्त केली पाहिजे. कोकण रेल्वे पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात दखल घेतली पाहिजे अन्यथा अन्याय निवारण समितीला घुसावे लागेल, अशी स्पष्ट व रोखठोक प्रतिक्रिया अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिली आहे. गणेशोत्सवासाठी रेल्वे आरक्षण सुरू होताच काही मिनिटात सर्व गाड्यांचे आरक्षण फुल झाल्याचे निदर्शनास येताच मुंबईकर चाकरमानी गणेशभक्तांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. तसेच सर्व बाजूनी या विषयाची दखल घेण्यात आली. सर्व गाड्यांचे आरक्षण फुल होणे श्यक्यच नसल्याचे सांगत काहीतरी गोचमेट असल्याचा आरोप होत आहे. काही चाकरमान्यांनी या बाबत कोकणरेल्वे अन्याय निवारण समितीकडे तक्रार केली आहे.
याबाबत शौकत मुकादम म्हणाले गेले कित्येक वर्षे हे प्रकार कोकण रेल्वेत सुरू आहेत. यापूर्वी आम्ही काही दलालांना रंगेहात पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. काही ठराविक लोक दिवसरात्र तिकीट खिडकी जवळ घुटमळत असतात. त्याच ठिकाणी झोपतात. आशा लोकांची चौकशी रेल्वे पोलिसांनी केली पाहिजे. हे ठराविक लोक येथे रोज काय करतात? या बाबत रेल्वे प्रशासन दखल का घेत. नाही? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.आरक्षणे फुल होत नाहीत तर ती दलालांच्या घशात जातात. आणि नंतर दुप्पट पैशाने ती प्रवाशांना विकली जातात. प्रवाशांकडे तिकीट नाही. मग एजंटलोक कोठून तिकीट आणतात.? तर येथे एक साखळी निर्माण झालेली आहे. त्याला प्रशासनातील काहींची साथ आहे. त्याशिवाय हे श्यक्य नाही. असा थेट आरोपच शौकत मुकादम यांनी केला आहे. ही साखळी मोडून काढणे सहज श्यक्य आहे. परंतु रेल्वे प्रशासनाची तशी मानसिकता हवी असेही ते म्हणाले.
आरक्षण करताना प्रवाशांचे नाव घेतले जाते, तिकिटावर नाव नमूद असते. आशा वेळी रेल्वेत तिकीट तपासताना प्रवाशांच्या नावाचे ओळखपत्र आणि तिकीटवरील नाव याची पडताळणी केल्यास सर्वकाही उघड होईल. रेल्वेतील अधिकारी व रेल्वे पोलिसांचे एक पथक कार्यरत केल्यास दलालांची साखळी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली पाहिजे. अन्यथा अन्याय निवारण समितीला ते काम करावे लागेल. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
वंदे भारत थांबवावीच लागेल – वंदे भारत ही नवीन रेल्वे कोकण रेल्वे मार्गावरून सुरू करण्यात येणार आहे. या बाबत शौकत मुकादम म्हणाले वंदे भारत रेल्वे त्यांना चिपळूणला थांबवावीच लागेल. कारण २० वर्षांपूर्वी कोकण रेल्वे प्रशासनाने आम्हला लेखी पत्र दिले आहे. त्यामध्ये सर्व सुपर एक्सप्रेस रेल्वे चिपळूणला थांबतील असे नमूद आहे. रेल्वे मध्ये पाणी आमच्या वाशिष्ठी नदीतील घेतले जाते. तसेच इंधन टाकीसाठी जागा देखील आमच्या कडूनच घेण्यात आलेली आहे. अशी आठवण करून देत जर वंदे भारतला चिपळूण थांबा मि ळाला नाही तर पाणी बंद करू, यापूर्वी तसे करून दाखवलेले आहे. त्याची व आठवण प्रशासनाला चांगलीच आहे, असेही मुकादम यांनी म्हटले आहे.