24.9 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeRatnagiriनिकडीच्या वेळी सोने पडते उपयोगी

निकडीच्या वेळी सोने पडते उपयोगी

मागील वर्षभर कोरोना महामारीमुळे सर्व व्यापार उद्योग, शाळा कॉलेज, खाजगी अस्थापना सर्व बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने अनेक लोक बेरोजगार झाले. अनेकांना आपल्या नोकरी धंद्यावर पाणी सोडावे लागले, तर काही वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे. अनेकांना घरातील स्त्रियांचे दागिने सुद्धा गहाण ठेवून चरितार्थ भागवावा लागत आहे. व्यावसायिकही अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करत आहेत.

कोरोना महामारीच्या या काळात आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी घरातील सोन्याचे उपहार कामी येतात. बँक ऑफ महाराष्ट्र रत्नागिरी शहर शाखेतर्फे महासोने तारण कर्ज योजना सुरु करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र रत्नागिरी शहर गाडीतळ शाखेचे प्रमुख प्रबंधक आनंद डिंगणकर यांनी व्यावसायिक, लहान मोठे उद्योग धंदे असलेल्या व्यापाऱ्यांना तसेच शेतकरी आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या सर्व ग्राहकांना आवाहन केले आहे कि, सदर योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा. व्यवसायासाठी लागणारी निकड असो वा मंजुरी हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

सदर योजनेंतर्गत ग्राहकांना जास्तीत जास्त कर्ज आणि कमीत कमी व्याजदरामध्ये उपलब्ध होणार आहे. सध्या कृषीसाठी ७.३०% आणि इतर सर्वाना ७.३५ % वार्षिक व्याज दराने कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कमी कागदपत्रे आणि केवळ १५ मिनीटांमध्ये कर्ज मंजुरी हे या योजनेचे ठळक वैशिष्ट्य आहे. सदर योजना बँक ऑफ महाराष्ट्र रत्नागिरीच्या सर्व शाखांमध्ये सुरु असून, ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे त्यांनी जवळील शाखेशी त्वरित संपर्क साधून माहिती घ्यावी.

RELATED ARTICLES

Most Popular