27.5 C
Ratnagiri
Tuesday, December 3, 2024

एकनाथ शिंदेंनी भाजपची झोप उडविली सरकारला बाहेरून पाठिंब्याचा प्रस्ताव?

मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने नाराज झालेल्या एकनाथ शिंदेंनी...

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात घडामोडीचे संकेत

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडीचे संकेत...

‘कोरे’चे विलीनीकरण झाल्यास गुंतवणूक सुलभ – अॅड. विलास पाटणे

कोकण रेल्वे महामंडळाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर रेल्वे मंत्रालयाने...
HomeMaharashtraनियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान – उपमुख्यमंत्री

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान – उपमुख्यमंत्री

नियमित कर्जदारांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देताना कोणत्या वर्षांतील आणि कोणत्या शेतकऱ्यांना तो लाभ द्यायचा, याचाही अभ्यास ही समिती करणार आहे.

राज्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंतचे अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती. दरम्यान पात्र शेतकऱ्यांची यादी ११ मे पर्यंत सहकार विभागाकडे देण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. याचबरोबर या योजनेची स्पष्टता आलेली नाही. या योजनेची स्पष्टता आल्यानंतर संगणकीय प्रणाली पूर्ण होऊन पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान या सर्व बाबी पूर्ण होण्यास ऑगस्ट पर्यंत कालावधी लागण्याची शक्यता आहे.

महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेत नियमित पीक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाची घोषणा करतानाच यंदाचे वर्ष महिला शेतकरी- शेतमजूर सन्मान वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती.

अर्थसंकल्प सादर करताना पवार यांनी, कृषी क्षेत्र हाच विकासाचा पाया आहे, यावर सरकारचा विश्वास आहे. त्यामुळे या क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी ३ हजार कोटींची भरीव तरतूद केल्याचा दावा केला. तसेच हे वर्ष ‘‘महिला शेतकरी व शेतमजूर सन्मान वर्ष’’ म्हणून राबविण्याची घोषणा करताना पवार यांनी महिला शेतकऱ्यांकरीता कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्के तरतूद वाढवून ५० टक्के करण्यात येईल.

कर्जमाफीच्या लाभासंदर्भात अभ्यास करण्यासाठी यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काही मंत्र्यांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. नियमित कर्जदारांना ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देताना कोणत्या वर्षांतील आणि कोणत्या शेतकऱ्यांना तो लाभ द्यायचा, याचाही अभ्यास ही समिती करणार आहे. कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत थकबाकीत नसलेल्या नियमित कर्जदारांनाच हा लाभ मिळू शकतो, असे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular