30 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्यांना कुलूप

कोकणरेल्वे मार्गावरील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कोकण रेल्वेच्या...

वाशिष्ठीतील गाळासाठी ७० जणांचे अर्ज – स्वखर्चाने वाहतूक

चिपळूण शहरांमध्ये पुराचे पाणी भरते त्याला वाशिष्ठी...

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध

जिल्हा परिषद व पंचायत झालेल्या अधिकारी, कर्मचान्यांना...
HomeRatnagiriकोकणरेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदवार्ता ! ‘या’ तारखेपासून सुरु होणार नवी एक्सप्रेस ट्रेन

कोकणरेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदवार्ता ! ‘या’ तारखेपासून सुरु होणार नवी एक्सप्रेस ट्रेन

मध्य रेल्वे सावंतवाडी ते पनवेल यादरम्यान ही गाडी चालवणार आहे.

देशात सार्वजनिक वाहतुकीमध्ये रेल्वेचा मोठा वाटा आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करीत असतात. ज्या मार्गावर रेल्वे नाही तिथे सुद्धा आता रेल्वे ट्रॅक आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. महाराष्ट्रात सुद्धा रेल्वेचे प्रवासी अधिक आहेत. कोकण रेल्वेचा सुद्धा मोठा वाटा महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये आहे. कोकण रेल्वेच्या बाबतीत रेल्वे विभागामार्फत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय.

सावंतवाडी ते पनवेल रेल्वे – मध्य रेल्वे सावंतवाडी ते पनवेल यादरम्यान ही गाडी चालवणार आहे. ही स्पेशल ट्रेन १२ नोव्हेंबरला धावणार आहे आणि परतीच्या प्रवासात ही गाडी १३ नोव्हेंबरला चालवली जाणार अशी माहिती हाती आली आहे.यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. या गाडीमुळे प्रवाशांचे अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे.

कसे असेल वेळापत्रक ? – सावंतवाडी-पनवेल साप्ताहिक स्पेशल ट्रेन सावंतवाडी येथून रात्री ११.२५ वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे. ही गाडी परतीच्या प्रवासात पनवेल येथून सकाळी ९.४० वाजता सोडली जाणार आहे अन त्याच रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी सावंतवाडी येथे पोहोचणार आहे.

‘या’ स्थानकांवर घेणार थांबे – मिळालेल्या माहितीनुसार ही विशेष रेल्वे २० एलएचबी डब्यांची असून कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, रोहा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular