20.3 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeMaharashtraकोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मिळणार सानुग्रह सहाय्य

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मिळणार सानुग्रह सहाय्य

राज्य सरकारने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना दिलासा दिला आहे. अशा कुटुंबीयांना ५० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याविषयीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.मेडिकल सर्टिफिकेट किंवा मृत्यूच्या कारणात ‘कोविड-१९ मुळे मृत्यू’ याप्रमाणे नोंद केली गेली नसली तरीही अटीची पूर्तता होत असल्यास ५० हजार रुपये मदत देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

कोरोनामुळे कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचे निधन झाल्यामुळे कुटुंबासमोर उदर निर्वाहाचा प्रश्न उभा राहिला  आहे. अशा लोकांना राज्य सरकाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोव्हिड १९ चे प्रकरणात जर व्यक्तीचा रुग्णालयामध्ये दाखल असतांना मृत्यू रुग्णालयात झालेला असेल,  जरी मृत्यू ३० दिवसाच्या नंतर झाला असेल तरी, अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोव्हिड १९ चा मृत्यू समजण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यात जी व्यक्ती कोव्हिड-१९ या आजारामुळे निधन पावली आहे, त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना रु.५०,००० इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून ही सहाय्यता करण्यात येणार आहे.

हि मदत मिळवण्याकरिता कोव्हिड-१९ आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेईवाईकानी राज्य शासनाने विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी अर्जदार स्वतः किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकणार आहे. त्यामुळे जि मदत मिळणार आहे ती मदत आता थेट नातेवाईकांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यानुसार आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून घेऊन लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे. मात्र ही मदत मिळण्यासाठी वेगवेगळे निकष देखील लावण्यात आले आहेत. असे स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular