25.7 C
Ratnagiri
Friday, September 30, 2022

माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक “ती” आहे

दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका पदुकोण आणि...

सचिन रायपूरच्या मैदानावर आणि पावसाला सुरुवात

रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेतील पहिला उपांत्य सामना...

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे गटातील नेत्यांची...
HomeRatnagiriसाई रिसॉर्ट ऑक्टोबर महिन्यात होणार जमीनदोस्त

साई रिसॉर्ट ऑक्टोबर महिन्यात होणार जमीनदोस्त

या प्रकरणात ज्यांनी दिरंगाई केली त्या अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल असं सोमय्या म्हणाले.

उद्धव ठाकरे सरकार जुलै महिन्यात जमिनदोस्त झाले आता ऑक्टोबर महिन्यात अनिल परबांचे रिसॉर्ट जमिनदोस्त होईल, असा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. बुधवार दि. ७ सप्टेंबर रोजी सोमय्या हे रत्नागिरी दौऱ्यावर आले होते.

अनिल परब यांचे मुरूड येथील साई रिसॉर्ट जमीनदोस्त तर होणारच असं सोमय्या म्हणाले. परंतु या प्रकरणात ज्यांनी दिरंगाई केली त्या अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल असं सोमय्या म्हणाले. बुधवारी रत्नागिरी दौऱ्या‍वर आलेल्या सोमय्या यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या भेटी घेतल्या.

अ‍ॅड. अनिल परब यांनी दापोली मुरूड येथे सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून साई रिसॉर्ट बांधल्याचा ठपका सोमय्यांनी ठेवला होता. त्या संदर्भात पाठपुरावा करत रिसॉर्ट पाडून परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सोमय्यांनी पावले उचलली आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या म्हणाले, ‘तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळेच साई रिसॉर्टवरील कारवाई जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी केली नाही.

ते पुढे म्हणाले, एका बाजूला परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे काम सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला परब यांनी फसवणुक केली. खोटे दस्तावेज तयार केले. यासंदर्भात परब यांच्या विरोधात फौजदारी कारवाई व्हावी, यासाठी राज्य सरकारने खेड येथील दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या याचिकेची सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे. त्यानंतर परब यांचे विरोधात फौजदारी खटला दाखल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच रिसॉर्ट प्रकरणात १५ हजार ८०० स्क्वेअर फुटाचे बांधकाम करताना रोख रकमेचा वापर करण्यात आला असल्याचा संशय असून या प्रॉपर्टीचा करही परब यांनी भरला आहे. या प्रकरणातही आयकर विभागाकडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular