27.1 C
Ratnagiri
Thursday, December 12, 2024

पारंपरिक लाल चेंडूवर भारतीयांचा सराव – रोहित शर्मा

(पीटीआय) गुलाबी चेंडूवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या...

Vivo X 200 स्मार्टफोन सीरीज उद्या लॉन्च होणार आहे…

टेक कंपनी Vivo उद्या (12 डिसेंबर) X...
HomeRatnagiriरत्नागिरीतील मलुष्टे स्टील अॅण्ड पाईपच्या दोन पेढ्या व गोडाऊनवर जीएसटी खात्याचा छापा

रत्नागिरीतील मलुष्टे स्टील अॅण्ड पाईपच्या दोन पेढ्या व गोडाऊनवर जीएसटी खात्याचा छापा

रत्नागिरीच्या बाजारपेठेत मात्र हे छापे आणि त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

रत्नागिरीतील प्रसिद्ध मलुष्टे स्टील अॅण्ड पाईप्स या नामांकीत व्यावसायिकांच्या २ पेढ्या आणि गोदामावर गुरुवारी अचानक जीएसटी (वस्तू आणि सेवा कर विभाग) पथकाने टाकलेल्या छाप्याची जोरदार चर्चा रत्नागिरीच्या बाजारपेठेत सुरु असून शुक्रवारी दुसऱ्या दिवशी देखील या पथकामार्फत तीनही ठिकाणी अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची छाननी सुरु असल्याचे बोलले जाते. छापा पडून २४ तास उलटले तरीही छाननी सुरुच असल्याने चर्चानाही मोठे उधाण आले आहे. गेले दोन दिवस कसली एवढी छाननी सुरु आहे आणि या पथकाला तेथे काय ‘घबाड’ सापडले आहे की काय अंशी चर्चा साऱ्या रत्नागिरीच्या बाजारपेठेत आणि नाक्या नाक्यावर सुरु आहे. मात्र त्याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती संबंधित विभागाने दिलेली नाही. गुरुवारी सकाळी ११ वा. च्या सुमारास मलुष्टे स्टील अॅण्ड पाईप्स च्या दोन्ही पेढ्यांवर जीएसटी विभागाच्या पथकाचा छापा पडल्याची चर्चा वाऱ्यासारखी रत्नागिरीच्या बाजारपेठेत सुरु झाली आणि एकच खळबळ उडाली. केवळ या २ दुकानांवरच छापा पडला असे नाही तर त्यांच्या एका गोदामावरदेखील त्याच वेळी छापा पडल्याची चर्चा सुरु आहे.

कोल्हापूरहून आले पथक? – जीएसटी विभागाचा हा छापा असून त्यासाठी कोल्हापूरहून विशेष अधिकाऱ्यांचे पथक आल्याची चर्चा सुरु आहे. बाजारपेठेतील संबंधित फर्मचे दुकान आणि एमआयडीसीतील आणखी एक दुकान अशा दोन्ही ठिकाणी एकाचवेळी ही धाड पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यानंतर याच फर्मच्या एका गोडावूनवरही ‘छापा पडल्याचे बोलले जाते.

चर्चाना पेव – गुरुवारी सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली आणि चर्चांना अधिकच पेव फुटले. अचानक धाड कशासाठी पडली? कोणी टाकली? काय सापडले? घबाड सापडले की काय? अशा विविध चर्चा दिवसभर सुरुच होत्या.

कागदपत्रांची छाननी ? – या २ दुकानांसह गोदामावरही एकाच वेळी छापा पडला आणि आलेल्या अधिकाऱ्यांनी शटर बंद करुन कागदपत्रांची छाननी सुरु केली असे बोलले जाते. गुरुवारी सायंकाळी उशीरापर्यंत हे पथक या तिन्ही ठिकाणी कागदपत्रांची छाननी करत होते असे साऱ्या रत्नागिरीत चर्चिले जात आहे.

आजही छाननी – विशेष म्हणजे गुरुवारी सायंकाळी उशीरोपर्यंत या पथकाने तपासणी, छाननी केली मात्र ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे शुक्रवारी देखील अधिकाऱ्यांचे पथक सलग दुसऱ्या दिवशी याच दुकानांमध्ये आणि गोडावूनमध्ये कागदपत्रांची छाननी कसून करत होते असेही चर्चिले जाते. २४ तास उलटून गेले तरीदेखील छाननी पूर्ण झाली नाही असे बोलले जात आहे.

‘घबाड’ सापडले की काय? – सलग दुसऱ्या दिवशी जीएसटी विभागाच्या पथकाची छाननी सुरु ‘असल्याचे कळताच शहरात आणि व्यापाऱ्यांमध्ये काय घबाड सापडले की काय असाही प्रश्न चर्चेद्वारे उपस्थित केला जात आहे. दोन्हीही फर्म मोठ्या असून त्यांचा टर्नआऊट लक्षात घेता बऱ्याच कागदपत्रांची छाननी करण्यात येत असावी आणि त्यामुळे हा वेळ लागला असावा असेही बोलले जाते. दोन दिवसाच्या या छाननीमध्ये नेमके काय हाती आले याविषयी देखील उलट सुलट चर्चाना पेव फुटले आहे. मात्र अधिकृतपणे अजून संबंधित खात्याने कोणतीही माहिती दिलेली नाही. रत्नागिरीच्या बाजारपेठेत मात्र हे छापे आणि त्याची जोरदार चर्चा सुरु आहे एवढे खरे.

RELATED ARTICLES

Most Popular