25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeRajapurआंबा, काजू, मासळीला हमीभाव द्या ! कोकणातील शेतकऱ्यांचे अनोखं आंदोलन

आंबा, काजू, मासळीला हमीभाव द्या ! कोकणातील शेतकऱ्यांचे अनोखं आंदोलन

दि. २२ ते २४ असे ३ दिवस भू, खिणगिणी या गावांमध्ये हे आंदोलन सुरू राहणार आहे.

समृध्द कोकण संघटनेच्या वतीने बेमुदत आंदोलनाची सुरूवात राजापूर तालुक्यातील भू येथून गुरूवारी झाली. ५०० हुन अधिक आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. जोपर्यंत कोकणातील शेतकरी व मच्छीमारांचे प्रश्न सुटत नाहीत तसेच शेतकरी व मच्छीमारांना योग्य हमीभाव मिळत नाही तोपर्यत हे आंदोलन सुरूच राहील असा निर्धार यावेळी शेतकऱ्यानी केला असून विधानसभा निवडणुकीपूर्वी मागण्या पूर्ण करा अन्यथा मतदान करणार नाही असा पवित्रा समृध्द कोकण स्वराज्य भूमी संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.

कोकणातील शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, पर्यटन विकास या न्याय हक्कांसाठी व मागण्यांसाठी शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समृध्द कोकण संघटना अध्यक्ष संजय यादवराव यांच्या नेतृत्वाखाली हे स्वराज्यभूमी आंदोलन हाती घेण्यात आले आहे. शेतकरी व मच्छिमारांचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत तसेच शेतकरी व मच्छिमारांना योग्य तो हम ीभाव मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असून दि. २२ ते २४ असे ३ दिवस भू, खिणगिणी या गावांमध्ये हे आंदोलन सुरू राहणार आहे.

येत्या २६ तारखेला रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून त्याचबरोबर आमरण उपोषणला सुरूवात होणार आहे. जोपर्यंत मच्छीमार व शेतकरी संघटनेच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असून जर का या आंदोलनाचा सरकारने योग्य तो विचार केला नाही तर मात्र येणा-या विधानसभा निवडणुकीत सरकारला घाम फोडल्यांशिवाय राहणार नाही तसेच विधानसभा निवडणुकीवर शेतकरी व मच्छीमार संघटनेच्या वतीने बहिष्कार टाकण्यात येईल असा देखील इशारा शेतकरी व मच्छीमार संघटना तसेच समृध्द कोकण स्वराज्य भूमी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

राज्यात उस, कापूस, सोयाबीन यासह अन्य पिके धोक्यात आली की शासन त्याची तत्काळ दखल घेते व त्यांना पॅकेज जाहिर करते. मात्र कोकणातील आंबा, काजू पिकासह मासेमारीवर संकट आले की शासन नेहमीच दुर्लक्ष करते असा आरोप आंदोलनकत्यांतून करण्यात आला. या आंदोलनात समृध्द कोकणचे संजय यादवराव व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समृध्द कोकंण संघटनेच्या वतीने गुरूवारपासून बेमुदत आंदोलनाची सुरूवात राजापूर तालुक्यातील भू गावातून करण्यात आली. याप्रसंगी संजय यादवराव व पदाधिकारी तसेच आपल्या मागण्यांचे फलक झळकाविताना शेतकरी, बागायतदार व मच्छीमार सहभागी झाले होते.

RELATED ARTICLES

Most Popular