27.7 C
Ratnagiri
Sunday, July 6, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeRatnagiriरत्नागिरीत झाली हापूस आंबा खाण्याची स्पर्धा

रत्नागिरीत झाली हापूस आंबा खाण्याची स्पर्धा

हापुस ऍग्रो टुरिझम च्या वतीने तीन दिवसाचा समर कॅम्प आयोजित केला होता. या तीन दिवसांमध्ये मज्जा मस्ती व प्रत्यक्ष आंबे काढण्याचा अनुभव घेण्यात आला त्याच वेळेला नदीतल्या आंघोळीची मज्जाच काही निराळी होती. उत्कृष्ट भोजना बरोबर निसर्गामध्ये राहण्याचा अनुभव प्रत्यक्ष मुलांनी घेतला. रस्सीखेच, स्विमिंग, जंगल सफारी अशा विविध ट्रॅकचे आयोजन केले होते
हापुस ऍग्रो टुरिझम
तिसऱ्या दिवशी तर जगावेगळी स्पर्धा घेण्यात आली, ती होती आंबा खाण्याची स्पर्धा ! या स्पर्धेला मुलानी उस्फूर्त प्रतिसाद दिला. आंबे खात असताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता तो वेगळाच होता. हापुस ऍग्रो टुरिझम चे सर्वोसर्वा दीपक उर्फ बंधू नागवेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
आंबे खाण्याच्या स्पर्धेमध्ये
प्रथम क्रमांक: मंथन मालगुंडकर
(या स्पर्धकाने साडेपाच आंबे पाच मिनिटात पूर्ण केले)
हापूस आंबा स्पर्धा
द्वितीय क्रमांक: हिमानी कीर
(चार आंबे खाऊन पूर्ण केला)
तृतीय क्रमांक: राज घाणेकर
(यांनी साडेतीन आंबे खाल्ले)
या कार्यक्रमाला शाबासकी देण्यासाठी तोणदे गावचे सरपंच सचिन भुवड, तोणदे देवस्थान अध्यक्ष महेश महाकाळ, उद्योजक प्रकाश लिमये, सामाजिक कार्यकर्ते विनय फळणीकर आणि आयोजक बंधू नागवेकर व सर्व स्पर्धेतील मुले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा आगळा वेगळा कार्यक्रम घेत असताना मनाला समाधान मिळते व यापुढे असेच कार्यक्रम घेण्याचे आश्वासन आयोजक बंधू नागवेकर यांनी केले.
हापुस ऍग्रो टुरिझम आंबा स्पर्धा
RELATED ARTICLES

Most Popular