25.7 C
Ratnagiri
Friday, September 30, 2022

माझ्यासोबत घडलेल्या सर्वोत्कृष्ट गोष्टींपैकी एक “ती” आहे

दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर दीपिका पदुकोण आणि...

सचिन रायपूरच्या मैदानावर आणि पावसाला सुरुवात

रोड सेफ्टी क्रिकेट मालिकेतील पहिला उपांत्य सामना...

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच शिंदे गटातील नेत्यांची...
HomeEntertainmentरिल्स बनवण्याचा नादात लाल महालात अवतरली चंद्रमुखी, कारवाईची मागणी

रिल्स बनवण्याचा नादात लाल महालात अवतरली चंद्रमुखी, कारवाईची मागणी

हे प्रकरण चिघळत जात असल्याचं पाहून वैष्णवीने सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली आहे.

जिजाऊ-शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. मात्र पुणे महानगरपालिका आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांकडून लाल महाल बंद ठेवण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे जिजाऊ-शिवरायांच्या लाल महालात रिल्स बनवण्याचा नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुलींना नाचवले जात आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केली आहे.

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पुनित झालेल्या पुण्यनगरीतील लाल महालात नृत्यांगना वैष्णवी पाटील हिने काही दिवसांपूर्वी लावणीचा व्हिडिओ शूट केला होता. दिग्दर्शक प्रसाद ओक च्या चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा या गाण्यावर वैष्णवी थिरकताना दिसली. महालातील मध्यवर्ती ठिकाणी वैष्णवी बेभान होऊन नाचली. यानंतर संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप नोंदवला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर वैष्णवी पाटीलसह तिघांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता हे प्रकरण चिघळत जात असल्याचं पाहून वैष्णवीने सोशल मीडियावर जाहीर माफी मागितली आहे.

ज्या लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या शाहिस्तेखानाची बोटं छाटली, ज्या लाल महालात राहून शिवाजी महाराजांनी कोंढणा जिंकण्याचं स्वप्न पाहिलं, त्याच लाल महालात वैष्णवीने लावणीवर डान्स केला. विशेष म्हणजे लाल महालात महापालिकेचे सुरक्षा रक्षकही तैनात असतात. मात्र तरीही संबंधित कलाकार आणि तरुणांनी सुरक्षारक्षकाला हाताशी धरुन लाल महालात लावणीचं शूट केल्याचा आरोप केला जात आहे. इन्स्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी चक्क लाल महालमध्ये लावणी करण्यात आली.

‘लाल महाल पुणे महानगर पालिकेने बंद ठेवला. मात्र तिथे सिनेमातील गाण्यांवर तसेच तमाशातील गाण्यांवर डान्स करण्याचा कार्यक्रम व्हावा, एवढी वाईट अवस्था लाल महालाची झाली आहे. महाराष्ट्राच्या स्मृतीस्थळावर असं बिभत्स पद्धतीने गाणं वाजवलं जातं, डान्स केला जातो हे लज्जास्पद आहे.

RELATED ARTICLES

Most Popular