25.7 C
Ratnagiri
Saturday, April 19, 2025

विद्यार्थ्यांच्या शोधात जिल्हा परिषदेचे शिक्षक घरोघरी

नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत प्रवेश...

जिल्हावासीयांचे १२३ प्रश्न निकाली – पालकमंत्री उदय सामंत

रस्त्यांचे डांबरीकरण होत नाही, साकव नाही, जागेचा...

प्रस्तावित ८४ लघुउद्योगतून रोजगारनिर्मिती सोवेली औद्योगिक वसाहत

मंडणगड तालुक्यातील युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध...
HomeRatnagiriगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूसची लंडनवारी…

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूसची लंडनवारी…

रत्नागिरी, राजापूर आणि देवगड येथील २ हजार डझन आंबा युरोपला रवाना झाला.

गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त साधण्यासाठी बागायतदार, शेतकऱ्यांची लगबग सुरू असताना कोकणातील हापूस आंब्याने युरोपवारी साधली आहे. ‘ग्लोबल कोकण’ संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारांचा सुमारे दोन हजार डझन हापूस लंडनच्या बाजारपेठेमध्ये दाखल झाले आहेत. भारतीय चलनाप्रमाणे एक डझन आंब्याला लंडनमध्ये २१०० रुपये दर मिळाला आहे. कोकणातील हापूस आंब्याला योग्य भाव आणि येथील शेतकरी, बागायतदार यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्लोबल कोकण या संस्थेच्या माध्यमातून हापूस आंबा अभियान राबवण्यात येत आहे. त्यातून, लंडनच्या बाजारपेठेमध्ये हापूस आंबा दाखल झाला आहे. ग्लोबल कोकण या संस्थेच्या माध्यमातून कोकणातील हापूस आंब्यासाठी येथील शेतकरी, बागायतदार यांना देशी-परदेशी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हापूस आंबा अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी आमदार प्रसाद लाड यांच्यासह लांजा येथील आबिद काजी, रत्नागिरी येथील श्री. कळंबटे, दीपक उपळेकर, दत्तात्रय तांबे, देवगड येथील नरेश डामरी आणि शेतकरी, बागायतदारांनी नियोजन केल्याचे ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांनी सांगितले.

हापूस आंब्याला लंडनमध्ये बाजारपेठ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तेजस भोसले, सचिन कदम यांनी युरोपमध्ये राहून मार्केटिंगसाठी सहकार्य केले. रत्नागिरी, राजापूर आणि देवगड येथील २ हजार डझन आंबा युरोपला रवाना झाला. त्यातील एक हजार डझन आंबा लंडनमध्ये तर उर्वरित युरोपमधील अन्य देशांत विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे. पुण्यामधून आवश्यक त्या प्रक्रिया करून हापूसचे बॉक्स विमानाने लंडनला पोहोचले. लंडनसाठी फायटो सॅनटरी सर्टिफिकेट तर युरोपमधील अन्य देशांसाठी उष्णजल प्रक्रिया करण्यात आले होते. आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करूनच हापूस पाठविल्याचे यादवराव यांनी सांगितले. लंडनमध्ये हापूसचे पूजन करण्यात आले. सुरुवातीला लॅबनॉनमधील वेस्टर्न इंटरनॅशनल मार्केटचे केतूल पटेल यांनी ५१ पौंड (भारतीय चलनानुसार ५१०० रुपये) पर डझनने विक्री झाली. सुमारे ११ डझन आंबे त्यांनी विकत घेतले. तर उर्वरित आंब्यांना २१०० रुपये पर डझन असा दर आकारण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular