31.5 C
Ratnagiri
Sunday, January 19, 2025

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय ग्राहकहिताविरोधी – मोहन शर्मा

राज्यात स्मार्ट वीजमीटर बसवण्याचा घेतलेला निर्णय हा...

ठाकरे गटातील नाराजांशी सामंतांची गुप्त बैठक…

रत्नागिरीच्या राजकारणामध्ये लवकरच मोठी घडामोड होणार आहे....

मराठा माणूस कुणबी म्हणवून घेणार नाही : नारायण राणे

मराठा समाजाचा माणूस कुणबी म्हणवून घेणार नाही....
HomeRatnagiriरत्नागिरीतील हॉस्पिटलवर आरोग्य विभागाचा छापा

रत्नागिरीतील हॉस्पिटलवर आरोग्य विभागाचा छापा

हॉस्पिटलचे मालक डॉ. अनंत नारायण शिगवण यांच्यावर गुन्हा दाखल केला.

शहराजवळील टीआरपी येथील साई हॉस्पिटलवर आरोग्य विभागाने आज छापा टाकला. गर्भपात केंद्राची कोणतीही परवानगी नसताना या हॉस्पिटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्या, साहित्य सापडले. या गर्भपाताच्या गोळ्या अनधिकृतपणे महिलांना दिल्या जात असल्याचे उघड झाले. याप्रकरणी हॉस्पिटलचे मालक डॉ. अनंत नारायण शिगवण (वय ६७, रा. एमआयडीसी प्लॉट नं. २०, टीआरपी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. त्यांना नोटीस देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केल्याच्या तक्रारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्याकडे आल्या होत्या.

ग्रामीण पोलिसांनाही यावेळी बोलावण्यात आले होते. त्यांनी या हॉस्पिटलमध्ये बनावट रुग्ण तेथे करून पाठवला. त्यावेळी गर्भपात केंद्राची कोणताही परवानगी नसताना या रुग्णालयात गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचे आढळून आले. गर्भपाताचे साहित्यही मिळाले. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक भास्कर जगताप यांनी याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी डॉ. अनंत शिगवणच्या ‘वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१’चे कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची ‘सखोल चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टखाली नोंदणी ? – दरम्यान, तक्रार दाखल झाल्यावर हा प्रकार उजेडात आला. अजून किती हॉस्पिटलमध्ये असे प्रकार चालतात, हे आता आरोग्य विभागाने शोधण्याची गरज आहे. काही हॉस्पिटलना बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टखाली नोंदणी आहे का, हा देखील संशोधनाचा विषय आहे. या प्रकरणाने आरोग्य यंत्रणेच्या डोळ्यांवरची पट्टी काढली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular