25.4 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiri'कायाकल्प'त आरोग्य विभागाची छाप...

‘कायाकल्प’त आरोग्य विभागाची छाप…

एकूण १३७ आरोग्य संस्थांनी हा पुरस्कार पटकावला आहे.

कायाकल्प’ ही एक लोकाभिमुख व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सुनिश्चित करणारी योजना आहे. ग्रामीण भागातील आरोग्य संस्थांना सक्षम, स्वच्छ, विश्वासार्ह व रुग्णाभिमुख बनवण्याचे हे प्रभावी पाऊल आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या २०२४-२५ या वर्षातील की कायाकल्प पुरस्कारांची घोषणा आरोग्य विभागाच्या वतीने केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करून जिल्ह्यातील १ ग्रामीण रुग्णालय, १९ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ११६ आरोग्य उपकेंद्रे आणि एक नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, अशा एकूण १३७ आरोग्य संस्थांनी हा पुरस्कार पटकावला आहे. यामध्ये चिपळूण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूरने जिल्हास्तरीय प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला असून, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील प्रथम क्रमांक पुरस्काराची रक्कम रुपये दोन लाख जाहीर झाली आहे.

उर्वरित १८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी पुरस्कार रक्कम रुपये ५० हजार जाहीर झाली आहे. दापोली तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र शिरखळला उपकेंद्रस्तरावरील प्रथम क्रमांक पुरस्कार रक्कम रुपये एक लाख, तसेच उपकेंद्र माटवन व उपकेंद्र खेरडी यांना समान गुणांमुळे प्रथम रनरअप असलेली पुरस्काराची रक्कम रुपये ५० हजार विभागून प्रत्येकी २५ हजार रुपये जाहीर झाली आहे. उपकेंद्र पालगड द्वितीय रनरअप पुरस्कार रक्कम रुपये ३५ हजार व उर्वरित ११२ आरोग्य उपकेंद्रांना प्रोत्साहनपर पुरस्कार रक्कम रुपये २५ हजार जाहीर झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय देवरूखला ग्रामीण रुग्णालयस्तरावरील प्रोत्साहनपर पुरस्कार रक्कम रुपये एक लाख जाहीर झाली आहे.

या कायाकल्प पुरस्कारासाठी सर्व आरोग्य संस्थांना तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. पुढे लवकरच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

आरोग्य केंद्रस्तरावरील पुरस्कारप्राप्त गावे… – प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील पुरस्कारामध्ये चिपळूण तालुक्यातील रामपूर, कापरे, अडरे, खरवते; राजापूर तालुक्यातील धारतळे, सोलगाव; गुहागर तालुक्यातील कोळवली; दापोली तालुक्यातील पिसई, आसूद, उंबलें; संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, बुरंबी, वांद्री; लांजा तालुक्यातील रिंगणे, साटवली, शिपोशी; रत्नागिरी तालुक्यातील वाटद, कोतवडे यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES

Most Popular