25.9 C
Ratnagiri
Saturday, September 21, 2024

सिद्धांत चतुर्वेदीने ॲक्शनने जिंकली मनं, ‘युध्रा’ची कथा

सिद्धांत चतुर्वेदी यांचा न पाहिलेला अवतार असलेला...

अश्विनचे शतक सहा बाद १४४ नंतर भारताची मजल ३३९ पर्यंत

रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी ६...
HomeMaharashtraमी काय अंगठेबहाद्दर मंत्री वाटलो का? आरोग्यमंत्री तानाजी सावंत भडकले

मी काय अंगठेबहाद्दर मंत्री वाटलो का? आरोग्यमंत्री तानाजी सावंत भडकले

हाफकीनबद्दल केलेल्या विधानावरुन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची खिल्ली उडवली जात आहे

आरोग्यमंत्री तानाजी सावंत पुण्यातल्या ससून रुग्णालयाची पाहणी करत होते. यावेळी त्यांनी औषधाच्या कमतरतेवरुन डॉक्टरांना सुनावलं. हाफकीन माणसाकडून औषधं घेणं बंद करा, अशा शब्दांत त्यांनी डॉक्टरांना खडसावल्याने तेथील डॉक्टरांना देखील हसण थांबवता येत नव्हत अशा प्रकारचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत होतं. त्यावरुन सावंत चांगलेच ट्रोल होऊ लागले होते.

हाफकीनबद्दल केलेल्या विधानावरुन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची खिल्ली उडवली जात आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना सावंत माध्यमांवरच भडकले आहेत. हाफकीन माणसाकडून औषधं घेणं बंद करा, असं सावंत म्हणाल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत होतं. त्यावरुन आता सावंत भडकले आहेत.

माध्यमांना सुनावताना सावंत म्हणाले की, तुम्ही अशा चुकीच्या बातम्या चालवणार असाल तर आपण संवाद बंद करूया. मी पीएचडी आहे, हाफकीन माणूस हयात नाही, एवढं मला कळत नाही का, असं म्हणत सावंत माध्यमांवर भडकले आहेत. तानाजी सावंत आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, हे तुम्ही म्हणताय. तुम्हाला माध्यमांना हे सरकार आलेलं रुचत नाहीय.

माझं शिक्षण तुम्हाला माहित आहे ना. मी सोलापूरमध्ये मेरिटमध्ये शिकलेला विद्यार्थी आहे. मी पीएचडी केली आहे. हाफकीन नावाच्या माणसाकडून औषधं घेणं बंद करा, एवढा मूर्खपणा मी करेन का? औषधाचं क्षेत्र डिसेंट्रलाईझ केलं पाहिजे, हे मार्गदर्शन मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलं. आता हाफकीन माणसाचं काढून घ्या, असं मी म्हणेन का एवढा मूर्ख आहे का मी? मी किती संस्था, कारखाने चालवतो हे सगळं पाहा. अनेक पीएचडी होल्डर माझ्या हाताखाली काम करतात. मी काय अंगठेबहाद्दर मंत्री वाटलो का?

RELATED ARTICLES

Most Popular