27.6 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiriसंगमेश्वर तालुक्यात पावसाने दाणादाण...

संगमेश्वर तालुक्यात पावसाने दाणादाण…

संगमेश्वर आठवडा बाजारात पुराचे पाणी घुसले.

तालुक्यात रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संगमेश्वरमधील शास्त्री नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्यामुळे रामपेठ बाजारपेठेत पाणी भरले. त्यामुळे विद्यार्थ्यांना आज शाळेत पोहोचणे देखील अवघड झाले. रामपेठ येथील मुख्य रस्ते आणि गल्लीबोळ पाण्याखाली गेले असून व्यापार ठप्प झाला आहे. अनेक दुकाने आणि घरे पाण्यात बुडाल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक आणि ग्राहकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. या आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या असून, संगमेश्वरचे पोलिसपाटील कोळवणकर यांनी सांगितले की, शास्त्री नदीची पातळी सातत्याने वाढत आहे.

त्यामुळे नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना आपले मौल्यवान साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणताही अनर्थ टाळण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. संगमेश्वर-कसबा मार्गावर कसबा येथे शास्त्री नदीचे पाणी मोरीवर आल्याने संगमेश्वर-कसबा-नायरी वाहतूक मंदगतीने सुरू होती. कसबा इंग्लिश स्कूल शाळेच्या तळघरातील वर्गात पुराचे पाणी शिरले. संगमेश्वर-डिंगणी मार्गावरही शास्त्री नदीच्या पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पुराचे पाणी भरल्यामुळे ठप्प झाली.

संगमेश्वर-देवरूख मार्ग बंद – संगमेश्वर-देवरूख मार्गावर बुरंबीनजीक तीन ठिकाणी नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने हा मार्ग सकाळी आठ वाजल्यापासून बंद पडला. या मार्गावरून सर्व प्रकारची वाहतूक बंद झाल्याने आज अनेकांची मोठी गैरसोय झाली. बुरंबीनजीक संगमेश्वर-देवरूख मार्गाची तीन ठिकाणी उंची वाढवावी, अशी मागणी या निमित्ताने वाहनचालक आणि प्रवासीवर्गाने केली आहे.

संगमेश्वर आठवडा बाजारात पुराचे पाणी – संगमेश्वर आठवडा बाजारात पुराचे पाणी घुसले. सोमवारी रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शास्त्री आणि सोनवीला मोठ्या प्रमाणात पूर आला. संगमेश्वर आठवडा बाजारात पुराचे पाणी घुसले. संततधार सुरूच असल्याने पुराचे पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन संगमेश्वर येथील नदी किनाऱ्यालगतच्या व्यापाऱ्यांनी आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. तसेच चौपदरीकरणादरम्यान मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने तसेच महामार्गावरील पाण्याचे नियोजन नसल्याने संगमेश्वर परिसरातील वाहतूक संथगतीने सुरू होती.

RELATED ARTICLES

Most Popular