26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeMaharashtraमुंबई, कोकणासह गोव्यात अतिवृष्टी बंगालच्या उपसागरात नवं चक्रीवादळ

मुंबई, कोकणासह गोव्यात अतिवृष्टी बंगालच्या उपसागरात नवं चक्रीवादळ

चक्रीवादळ घोंगावत असल्याने गोवा, कोकण, मुंबईसह देशातील एकूण १२ राज्यांमध्ये पुढील ४ दिवस अतिवृष्टी संभवते.

मे महिन्यामध्ये बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन लांबल्यानंतर आता गेले काही दिवस संपूर्ण देशात धुवाधार पाऊस कोसळत आहे. पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले असून त्याचा फटका देशातील अनेक राज्यांना बसण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ घोंगावत असल्याने गोवा, कोकण, मुंबईसह देशातील एकूण १२ राज्यांमध्ये पुढील ४ दिवस अतिवृष्टी संभवते. या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून हा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईसह साऱ्या कोकणाला पाऊस झोडपून काढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात घोंगावणाऱ्या चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते आहे. या चक्रीवादळाचे नाव अजून निश्चित झालेले नाही. मात्र त्याचा परिणाम जाणवू लागला असून हे वादळ लवकर न विसावल्यास १२ राज्यांमध्ये अतिवृष्टी संभवते आणि पुराचा धोका वाढला आहे.

पुराचा धोका – हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशाच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तेलंगणामध्ये लोकांना पुढील ३ दिवस विनाकारण घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उत्तर भारतातील डोंगराळ भागातही पावसाचा इशारा देण्यात आला असून, त्यामुळे दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाच्या वर राहिल. यावेळी गंगा नदीलाही उधाण आले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे.

मुंबईला झोडपले – मुंबईत मुसळधार पावसामुळे सोमवारी जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारीदेखील मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत होता. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र तो वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान खात्याने मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी केला.

चक्रीवादळाचा धोका – हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होत आहे. हे पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरावर तयार होत आहे. हे वादळ समुद्रसपाटीपासून ५.८ ते ७.६ किमी उंचीवर असून, यामुळे २४ तासांत इथं कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोकणासह गोव्यात अतिवृष्टी? – या चक्रीवादळामुळे कोकण, गोवा, – मध्य महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि कर्नाटक किनारपट्टीच्या विविध भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. इथं एकूण ११५.६ मिमी ते २०४.४ मिमी पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, हिमाचल प्रदेश, राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, अंदमान आणि निकोबार बेटे, किनारी आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ६४.५ मिमी ते ११५.५ मिमी पाऊस अपेक्षित आहे.

गंगा-यमुना कोपली – एएनआयच्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळी २०५.४५ मीटर नोंदवण्यात आली आहे. हे धोक्याचे लक्षण आहे. सुमारे १० दिवसांपूर्वी दिल्लीतील लोकांना पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशात राजधानीत पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झाला आहे. हरिद्वारमध्ये गंगेच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. या दोन्ही नद्या नंतर उत्तर प्रदेशातील बहुतांश भाग व्यापतात. उत्तर प्रदेशातील अनेक भागात बुडण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसरीकडे, यमुनेची उपनदी हिंडनमध्येही अतिवृष्टीमुळे डोंगर कोसळत आहेत. नोएडा, गाझियाबादमधील अनेक भाग यामुळे रिकामे करण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular