29.8 C
Ratnagiri
Tuesday, May 21, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeChiplunमी स्वतः येतो… बघतोच कसे काम होत नाही! - उपमुख्यमंत्री अजित पवार

मी स्वतः येतो… बघतोच कसे काम होत नाही! – उपमुख्यमंत्री अजित पवार

नद्यांची व गाळ उपसा कामाची प्रत्यक्ष पाहणी करतो आणि काम कसे होत नाही तेच बघतो.

‘मी स्वतः चिपळूणला येतो, नद्यांची व गाळ उपसा कामाची प्रत्यक्ष पाहणी करतो आणि काम कसे होत नाही तेच बघतो. तुम्हाला आणि शेखरला दिलेला एक-एक शब्द मी पूर्ण करेन. ‘अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चिपळूण बचाव समितीला आश्वस्त केले. घाबरू नका मी तुमच्याबरोबर आहे, असा शब्दही ना. दादांनी यावेळी दिला. चिपळूणच्या वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा कामाची सध्यस्थिती आणि पुढील कामाबाबत आ. शेखर निकम यांच्यासमवेत चिपळूण बचाव समितीचे बापू काणे, राजेश वाजे आणि शाहनवाज शहा यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मंगळवारी सकाळी ७ वाजता देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. प्रचंड कामात व्यस्त असताना ना. दादांनी आवर्जून यावेळी चिपळूणकरांसाठी वेळ दिला. चिपळूणमधील पाऊस आणि पूरपरिस्थितीची विचारपूस करून विद्यमान परिस्थितीची माहिती घेतली.

निधी संपला – यावेळी बचाव समिती सदस्यांनी येथील गाळ काढणे कामाची संपूर्ण माहिती दिली. तीन टप्प्यात गाळ काढण्याचे नियोजन असले तरी पहिला टप्पा वगळता दुसऱ्या टप्प्यात काम समाधानकारक झालेले नाही. पहिल्या टप्प्यात आपण दिलेला १० कोटींचा निधी संपला. दुसऱ्या टप्प्यात निधी उपलब्ध झालाच नाही. पालकमंत्री उदय सामंत यांनी तातडीने काही निधी उपलब्ध करून दिला. मात्र तो पुरेसा नव्हता. शासनाने ४ कोटी ८० लाखाची तरतूद केली आहे मात्र तो निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात काम संथगतीने चालले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सकारात्मक दुष्टीकोन – दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्यासाठी पुरेसा निधी तसेच शासकीय यंत्रणा वेळेवर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी देखील यावेळी बचाव समिती सदस्यांनी केली. तसेच अन्य अनेक प्रश्नाबाबत देखील ना. अजितदादा यांच्याबरोबर चर्चा झाली. ना. दादांनीदेखील सर्व विषय अतिशय शांतपणे समजून घेतले. आमदार शेखर निकम यांनी देखील यावेळी मतदारसंघातील अनेक प्रश्न त्यांच्या समोर मांडले. सर्व विषयाबाबत अजित दादांचा अतिशय सकारात्मक दृष्टिकोन यावेळी दिसून येत होता, अशी माहितीही उपस्थितांनी यावेळी दिली.

मी स्वतः येतो – सर्व विषय समजून घेतल्यानंतर ना. अजितदादा म्हणाले, ‘मी लगेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावतो, सर्व माहिती घेतो आणि चिपळूणला येतो. अधिकाऱ्यांच्यासमवेत मी स्वतः प्रत्यक्ष वाशिष्ठी नदी आणि गाळ उपसा कामाची पाहणी करतो. आणि बघतोच काम कसे होत नाही तुम्हाला आणि शेखर ला दिलेला प्रत्येक शब्द मी पूर्ण करेन. चिपळूणची काळजी मला आहे. त्यामुळे घाबरू नका, मी तुमच्याबरोबर आहे, असा शब्दच त्यांनी चिपळूण बचाव समितीला यावेळी दिला.

RELATED ARTICLES

Most Popular