27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeChiplunऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरमध्ये हिमॅटोलॉजी

ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरमध्ये हिमॅटोलॉजी

ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरमध्ये वाजवी दरात उपचार घेता येतील. महिन्यातील प्रत्येक सोमवारी १० ते ४ या वेळेत या ठिकाणी रुग्णांकरिता ओपीडी सेवा उपलब्ध असणार आहे.

येथील ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरमध्ये हिमॅटोलॉजी विभाग सुरू करण्यात आला. विविध रक्त रोग (ब्लड कॅन्सर) असलेल्या रुग्णांसाठी येथे योग्य निदान व उपचार केले जाणार आहेत. या सेंटरमध्ये हिमॅटोलॉजिस्ट डॉ. सारंग वाघमोरे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या उपचार पुरवले जातील. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत कॅन्सर रुग्णांकरिता मोफत उपचार करण्यात येणार आहेत. हिमॅटोलॉजी हे एक महत्वाचे क्षेत्र आहे, जे रक्त आणि रक्त तयार करणाऱ्या ऊती आणि त्यांचे कार्य समजून घेण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावते. रक्तविकारांचे निदान आणि उपचार करण्यासाठी हे एक महत्वाचे साधन ठरते आहे.

हिमॅटोलॉजी हे रक्त आणि रक्त तयार करणाऱ्या ऊतींचा वैज्ञानिक अभ्यास आहे ज्यामध्ये पेशी, प्रथिने आणि रक्तनिर्मिती आणि कार्यामध्ये गुंतलेल्या जैवरासायनिक प्रक्रियांचा समावेश आहे. यामध्ये रक्तपेशींची रचना आणि कार्य तपासणे तसेच रक्तविकारांचे निदान आणि उपचार यांचा समावेश होतो. हिमोफिलिया, रक्ताच्या गुठळ्या, सिकलसेल रोग, हिमोफिलिया, इतर रक्तस्राव विकार आणि रक्त कर्करोग यांसारख्या आजारावर आता ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरमध्ये वाजवी दरात उपचार घेता येतील. महिन्यातील प्रत्येक सोमवारी १० ते ४ या वेळेत या ठिकाणी रुग्णांकरिता ओपीडी सेवा उपलब्ध असणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular