25.1 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeChiplunचिपळुणातील बसस्थानकाचे काम रखडले...

चिपळुणातील बसस्थानकाचे काम रखडले…

अपूर्ण बसस्थानकामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

येथे उभारण्यात येत असलेल्या ‘हायटेक’ बसस्थानकाच्या पहिल्या स्लॅबचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित काम रखडले आहे. उर्वरित कामाकरिता मंजूर २.८७कोटी पहिली निवादा काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाली होती. मात्र, त्याला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद लाभलेला नाही. अखेर त्या कामासंदर्भात पुन्हा निविदा काढण्यात आली आहे. जीर्ण मध्यवर्ती बसस्थानकाची इमारत तोडून त्या जागी नव्याने हायटेक बसस्थानक बांधण्यास काही वर्षांपूर्वी प्रारंभ झाला. मात्र, ठेकेदार व महामंडळाच्या कुचकामी भूमिकेमुळे या बसस्थानकाच्या बांधकामाचा सुरुवातीपासून बट्ट्याबोळ उडाला आहे. परिणामी, कित्येक वर्षे बसस्थानकाचे बांधकाम ‘जैसे थे’च होते. यानंतर नागरिक व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ओरड झाल्यानंतर महामंडळाने नव्या ठेकेदाराची कामाला सुरुवात केली. त्या ठेकेदाराने पायासह पहिल्या स्लॅबचे काम पूर्णत्वास नेले.

या कामी गती पाहता रखडलेले बसस्थानक लवकर पूर्णत्वास जाईल, अशी आशा चिपळूणवासीयांना होती; मात्र नव्या ठेकेदाराने पायासह पहिल्या स्लॅबचे काम पूर्ण केल्यानंतर उर्वरित बांधकामाकडे पाठ फिरवली. आमदार शेखर निकम यांनी बांधकामासाठी वाढीव निधीची तरतूद करावी याकरिता २० मार्च रोजी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात बैठक घेतली होती. त्यानंतर महामंडळाने रखडलेल्या उर्वरित मंजूर २ कोटी ८७ लाख ४२ हजारांच्या कामासाठीची पहिली निविदा काढली होती. अखेर २६ मार्चपर्यंत मुदत असलेली निविदा एकाही ठेकेदाराने भरलेली नाही. त्यानंतर या कामासंदर्भात पुन्हा निविदा काढण्यात आली असून त्याची ८ एप्रिल रोजी अंतिम मुदत देण्यात आली आहे.

मोकाट जनावरांचा वावर – अपूर्ण बसस्थानकामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. आगार प्रशासनाने प्रवाशांसाठी अपूर्ण इमारतीमध्ये बैठक व्यवस्था केली असली तरीही ती पुरेशी नाही. त्यामुळे प्रवासी तिथे बसण्यासाठी जात नाहीत. इतकेच नव्हे तर मोकाट जनावरे आणि कुत्र्यांसाठी अर्धवट बसस्थानक एक आश्रयस्थान बनले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular