28.2 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeKhedअपघातानंतर उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञाताने पळवली

अपघातानंतर उभी करून ठेवलेली दुचाकी अज्ञाताने पळवली

दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील जांबुर्डे गावानजीक रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवली होती.

महामार्गावर डागडूजीचे काम मोठया प्रमाणावर सुरु आहे. अनेकदा रस्त्यांच्या सुरु असलेल्या कामांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघात घडतात. तर काही वेळा, वाहन चालकांचा बेशिस्तपणा नडतो आणि अपघात घडतात. त्याची भीषणता एखाद्या वेळी एवढी असते कि, एखाद्याचा जीव सुद्धा त्यामध्ये गमवावा लागतो. शारीरिक हानी होते टी वेगळीच अधिक वाहनांचे देखील नुकसान मोठ्या प्रमाणात होते.

मागील आठवड्यात मुंबई-गोवा महामार्गावरील जांबुर्डे गावानजीक झालेल्या अपघातानंतर उभी करून ठेवलेली दुचाकी दि. २२ डिसेंबर २०२१ ते दि. ९ जानेवारी २०२२ या कालावधीत अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार खेड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

खेड पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, निखिल दिलीप मांडवकर वय २५, रा. उटंबर, चिंचवलीवाडी, ता. दापोली यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी एम.एच.०८ ए. के. ७९५७ अपघातानंतर दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील जांबुर्डे गावानजीक रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवली होती. तब्ब्येत बरी झाल्यावर दि. ९ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ते घटनास्थळी दुचाकी आणण्यासाठी गेले असता त्यांना तिथे त्यांची दुचाकी आढळली नाही. त्यांनी आजूबाजूचा परिसर पूर्णपणे पिंजून काढला, चौकशी केली असता सुद्धा काहीच माहिती मिळाली नाही.

अज्ञात इसमाने सुमारे पंधरा हजार रुपये किमतीची दुचाकी चोरल्याने त्यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस करत आहेत. अपघातग्रस्त दुचाकीची सुद्धा अशा प्रकारे चोरी केली गेल्याबद्दल स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. पोलीस सुद्धा त्या अज्ञात चोराचा कसून शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular