27 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRatnagiriगणपतीपुळेतील समुद्रकिनारी प्रवाहांमुळे तयार होतोय चाळ

गणपतीपुळेतील समुद्रकिनारी प्रवाहांमुळे तयार होतोय चाळ

या ठिकाणी एकाचा बुडून मृत्यू झाल्यामुळे तिथे प्रशासनाकडून लक्ष देणे आवश्यक आहे.

पावसाचे संकेत मिळाल्यानंतर समुद्राच्या लाटांचा वेगही वाढला आहे. त्यामुळे गणपतीपुळे येथील सुलभ शौचालयासमोर चाळ (वाळूत खड्डा) तयार झाला आहे. पर्यटकांची अजूनही किनारी भागात गर्दी असल्यामुळे धोकादायक परिसरात पोहण्यास मनाई करणे आवश्यक आहे. रविवारी (ता. २) या ठिकाणी एकाचा बुडून मृत्यू झाल्यामुळे तिथे प्रशासनाकडून लक्ष देणे आवश्यक आहे. गणपतीपुळे हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी दाखल होतात. यंदा लोकसभा निवडणुकांकडून हंगाम उशिराने सुरू झाला होता. अजूनही पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते.

 २६ मे रोजी जलपर्यटनाला शासनाने बंदी घातली त्यामुळे वॉटर स्पोर्टस् बंद झाले. त्यानंतर समुद्रस्नान करणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची भिस्त जीवरक्षकांवरच होती; मात्र दुर्घटना टाळण्यात सर्वांनाच यश आले. गेल्या चार दिवसांत वातावरणात झालेल्या बदलांमुळे किनारी भागात मान्सूनचे संकेत मिळू लागले आहेत. समुद्राच्या लाटांचा वेग वाढला आहे. भरतीच्यावेळी किनारी भागात संरक्षक भिंतीच्या जवळ लाटा येऊन आदळत आहेत. या परिस्थितीमध्येही पर्यटक समुद्रस्नानाला उतरत आहेत. रविवारी पर्यटकांची गर्दी होती. पावसाचे संकेत मिळाल्यानंतर समुद्राच्या लाटांचा वेगही वाढला आहे. त्यामुळे गणपतीपुळे येथील सुलभ शौचालयासमोर चाळ तयार झाला आहे. तिथे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडूनही पावले उचलणे आवश्यक आहे.

RELATED ARTICLES

Most Popular