कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, राज्यातील काही जिल्ह्यांमधील होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यामध्ये ३० मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरीही कोरोना संक्रमणाची सरासरी कमी होताना दिसत नाहीय, यामध्ये काही प्रमाणामध्ये होम आयसोलेशन पर्याय वापरणाऱ्यामुळे देखील कोरोणाचा संसर्ग वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोना संक्रमित असणाऱ्याना यापुढे होम आयसोलेशन हा पर्याय उपलब्ध असणार नाही. होम आयसोलेशन पर्याय वापरणारी संक्रमित रुग्ण आवश्यक तेवढी खबरदारी घेत नसल्याचे सुद्धा निदर्शनास आले असल्याचे सत्य समोर आले असल्याने या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जरी मेट्रो सिटी असणार्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक मध्ये कोरोना संसर्गाच्या प्रमाणात घट झालेली दिसून आली असली तरी काही जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी झालेले दिसून आले नाही. त्यामुळे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याविषयी कठोर निर्णय घेण्याची वेळ आली असल्याची माहिती देत, एकूण १५ जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमित रूग्णांसाठी होम आयसोलेशन हा पर्याय बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या १५ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग सहित सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, अकोला, बुलढाणा, वाशी, बीड, गडचिरोली, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या संदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्हिडियो कॉन्फारंसिंगच्या माध्यमातून कोरोना परिस्थितीबद्दल आढावा घेण्यासाठी काही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मिटिंग घेतली. त्यामध्ये कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी होम आयसोलेशन हा पर्याय जो आधी उपलब्ध होता तो यापुढे बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.