22.7 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मंत्री उदय सामंतांचे उद्या होणार जंगी स्वागत…

मंत्री उदय सामंत यांचे रविवारी (ता. २२)...

गुहागरमध्ये मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून २५ जण भाजले

मिडीबसच्या रेडिएटरचा पाईप फुटून रेडिएटरमधील उकळते, हिरवे...

कुंभार्ली घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करा – आमदार शेखर निकम

कुंभार्ली घाटमार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण, पशुसंवर्धन योजनांसाठी संमतीपत्राची...
HomeRatnagiriरत्नागिरीचा सन्मान हाच आमचा अभिमान : पालकमंत्री सामंत

रत्नागिरीचा सन्मान हाच आमचा अभिमान : पालकमंत्री सामंत

ध्वजरोहणानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी परेड निरिक्षण केले.

राज्यातील प्रथम क्रमांकाचे ९२ कोटी खर्चाचे प्रशासकीय भवन रत्नागिरीमध्ये उभारले जाणार आहे. राज्य शासनाची त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ‘रत्नागिरीचा सन्मान हाच आमचा अभिमान’, हे स्लोगन घेऊन रत्नागिरीकर आणि प्रशासने जोरदार काम करत आहे, असे उद्वार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले. येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ गणेश मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी उपस्थित होते.

प्रत्येकाच्या जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. जलजीवन मिशनम धून होणाऱ्या नळ पाणी योजनांसाठी ११०० कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, सिंधुरत्न ही ऐतिहासिक योजना आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी या योजनेमधून हाऊसबोट देण्यात आली आहे. महिलांनी चालविलेली हाऊसबोट येणाऱ्या पर्यटकांना पहायला मिळेल. जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी याचा निश्चित उपयोग होणार आहे. एपीजे अब्दुल कलाम जिल्ह्यातून घडले पाहिजेत. त्यासाठी गरिबांच्या मुलांना नासा आणि इखोला पाठविणारा राज्यातील पहिला जिल्हा रत्नागिरी ठरला आहे. ध्वजरोहणानंतर पालकमंत्री श्री. सामंत यांनी परेड निरिक्षण केले.

त्यानंतर झालेल्या संचलनात पोलीस मुख्यालय पथक, गृहरक्षक दल, पोलीस बँड पथक, गोगटे जोगळेकर म हाविद्यालयाचे एनसीसी आर्मी, एनसीसी नेव्हल, पटवर्धन हायस्कूलचे एनसीसी आर्मी, एनसीसी नेव्हल, ए डी नाईक ऊर्दू स्कुलचे स्काऊट गाईड पथक, जवाहर नवोदय विद्यालयाचे स्टुडंड पोलीस कॅडेट पथक, पोलीस श्वान पथक व्हिक्टर डॉगकडून मानवंदना, चित्ररथात म ोबाईल फारेंनसिंग इन्वेस्टींग व्हॅन, नगरपरिषदेचे अग्निशमन दल, १०८ रुग्णवाहिका, शिक्षण विभागातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व इतर उपक्रम, ढोल पथक, लेझिम पथक, महावाचन उत्सव, चांद्रयान मोहीम-जिल्हा परिषद शाळा, मुख्यमंत्री सुंदर माझी शाळा, नवभारत साक्षरता अभियान योजना विभाग, जिल्हा परिषदेच्या गोदुताई जांभेकर विद्यालय, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग, नवनिर्माण हायस्कूलचा ग्राम ीण शेतीदर्शन, मराठा मंदिर ग्लोबल स्कूलचा चित्ररथ, नगरपरिषेदचा पीएम आवास योजना, इव्हीएम मशीन आदींचा समावेश होता.

पालकमंत्र्यांच्या हस्ते अनुकंपाखाली नियुक्तीपत्र दैनंदिनी रोशन आंबेकर हिला जिल्हा माहिती कार्यालयातील शिपाई पदावर पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळे यांनी याबाबत पालकमंत्र्यांना माहिती दिली. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रमाच्या जिल्हास्तरीय विजेते निलिमा आखाडे, ज्युली रहाटे, रिध्दी माळी, मृण्मयी चिंचचौरे, साक्षी आंब्रे, गौरव सावंत, स्वरुप शिरगावकर, मानस गावकर, श्रृती पडघन, यश खामकर यांना प्रत्येकी १ लाख बीज भांडवल व प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे जिल्हा शासकीय रुग्णालय आणि बी के एल. वालावलकर यांना प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यांनतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES

Most Popular