27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

रत्नागिरी शहराचे वाटोळे करणाऱ्यांना घरी बसवा – बाळ माने

रत्नागिरी शहराच्या विकासाचा रोडमॅप भाजपकडे तयार आहे....

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...
HomeRatnagiriभैया सामंतांच्या पोस्टने राजकीय चर्चा

भैया सामंतांच्या पोस्टने राजकीय चर्चा

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे भावी उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू आणि सिंधूरत्न योजनेचे निमंत्रित सदस्य भैया ऊर्फ किरण सामंत यांनी सोशल मीडियावरील केलेल्या पोस्टने पुन्हा राजकीय चर्चाना उधाण आले आहे. भैया सामंत यांनी शुक्रवारी (ता. २६) थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा दौऱ्याची पोस्ट टाकली. लॅडिंग शॉर्टली… जमिनीवर, अर्थात हवेत होतो, आता जमिनीवर येतोय, असा स्टेट्स ठेवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भैय्या सामंत राजकारणामध्ये सक्रिय होताना दिसत आहेत. आपल्या शब्दाने एखाद्याचे भले होत असेल, तर त्यांच्या दालनात येणाऱ्या प्रत्येकाचे काम जागेवर करून देतात.

त्याची ही खासियतच त्यांना अधिक लोकप्रिय करत आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढत गेल्याने भैय्या सामंत यांचेही नाव मोठे झाले आहे. सिंधुरत्न योजनेच्या सदस्य पदानंतर आता त्यांच्याकडे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे भावी उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. सुरवातीला ते या उमेदवारीसाठी इच्छुक नव्हते. परंतु कालांतराने त्यांचीही मानसिकता झाली आहे. महायुतीने जबाबदारी दिली, तर मी निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर त्यांच्या पोस्ट चर्चिल्या जात आहेत. मागील काही दिवसांपासून किरण सामंत सोशल मीडियाच्या माध्यमातून काही संदेश किंवा इशारा देण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.

यापूर्वी भैय्या सामंत यांनी ‘कौन रोकेगा…’ हा स्टेटस् ठेवल्यानंतर अगदी तळकोकणात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यांच्या वाढदिवसाला शहरात नव्हे तर अगदी कुडाळ- मालवण पर्यंत त्यांचे भावी खासदार, भावी केंद्रीय मंत्री असे शुभेच्छांचे बॅनर झळकले होते. त्यांनी काल पुन्हा एक स्टेटस् ठेवले… हवेत होतो, आता जमिनीवर येतोय अशी अर्थाच्या या टिप्पणीची चर्चा मीडियावरही सुरू होती. त्यातच पुन्हा शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची पीडीएफ फाइल टाकली आणि अनेकांना राजकीय धक्का दिला आहे. हा नेमका कशाचा इशारा आहे, याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular