30.4 C
Ratnagiri
Saturday, February 21, 2026

शीळ धरणातून जॅकवेलमध्ये पाणी येण्यासाठीच्या पाईपलाईनचे काम पूर्ण

नैसर्गिक उताराने शीळ धरणातून जॅकवेलमध्ये पाणी येण्यासाठी...

नको शेलू नको वांगणी’ गिरणी कामगारांना घर मुंबईतच हवे

नको शेलू नको वांगणी गिरणी कामगारांना घर...

कुंभार्ली घाटात अवघड वळणावर भला मोठा कंटेनर पडला बंद

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारा महत्त्वाचा आणि...
HomeMaharashtraअजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? प्राथमिक अहवालात धक्कादायक माहिती समोर

अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? प्राथमिक अहवालात धक्कादायक माहिती समोर

अपघात नव्हे तर घातपातच आहे अशा शंका उपस्थित करण्यात येत आहेत.

अजित पवार यांना बारामतीला घेवून गेलेल्या विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे बारामती विमानतळावरील तांत्रिक सुविधांकडे दुर्लक्ष करत पायलटचा विमान लैंड करण्याबाबतचा अंदाज चुकल्याने अपघात झाला असा प्राथमिक कयास हवाई उड्डाण नियंत्रण अबरिटी म्हणजेच डीडीसीआयए ने काढला आहे. अजुनही तपास सुरू असून ब्लॅक बॉक्समधील माहितीचे संकलन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ब्लॅक बॉक्समधील डेटा डाऊनलोड झाल्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढता येईल असे देखील चौकशी करणाऱ्या या तपास यंत्रणेने म्हटले आहे. तपास यंत्रणेकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्राने उच्चस्तरीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त दिले आहे.

२८ जानेवारीला अपघात – २८ जानेवारीला सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास हा विमान अपघात झाला. त्यामध्ये अजित पवार यांच्याासह ५ जणांचा मृत्यू ओढवला. विमानाला अचानक आग लागली आणि त्यामुळे दुर्घटना घडली. विमान अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने डीडीसीआयए संस्थेला तपासाचे आदेश दिले आहेत.

विमानात तांत्रिक बिघाड – गेले १५ दिवस या संस्थेच्या तज्ञांनी तपास केला असून तो अजूनही पुर्ण झालेला नाही. मात्र प्राथमिक कयास वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार त्या लिअरजेट विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्याचवेळी लैंडिंग करण्याचा प्रयत्न पायलटने केला. मात्र लैंडिंग करण्यापुर्वी एअर ट्रॅफिक कंन्ट्रोलला संदेश देताना बारामती एअरपोर्टवर लैंडिंग संदर्भात जे काही तांत्रिक निकष आहेत त्याचे पालन न करता त्याने विमान लँड करण्याचा प्रयत्न केला. त्याचा तो अंदाज चुकला आणि त्यामुळे त्या विमानाला अपघात झाला. असा प्राथमिक कयास आहे.

कमी दृष्यमान्यता – अंदाज चुकण्यामागे बारामतीम ध्ये त्यावेळी असलेले धुके आणि कमी दृष्यमान्यता (व्हिजिबिलीटी) हे देखील एक कारण आहे. इतकी कमी व्हिजिबिलीटी असताना पायलटने विम ान लँड करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ते विमान पुण्याच्या दिशेने वळवायला हवे होते असेही म्हटले जात आहे. पायलटचे नेमके काय आणि कुठे चुकले याचा सखोल तपास अजूनही सुरू आहे.

स्फोट होवून आग भडकली – विमानाच्या इंधन टाक्यां फुल होत्या. विमान आदळताच स्फोट होवून आग भडकली आणि त्यामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू ओढवला, असे निरिक्षण या प्राथमिक अहवालात नोंदविण्यात आल्याचे सुत्रांच्या हवाला देत एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तामध्ये नमुद केले आहे. अर्थात अजुनही तपास पुर्ण झालेला नाही. ब्लॅक बॉक्सची तपासणी सुरू आहे. ब्लॅक बॉक्समधील रेकॉड झालेली माहिती पुर्णपणे हाती आल्यानंतर त्याचे सखोल विश्लेषण केल्यानंतरच अपघाताविषयी निष्कर्ष काढता येईल. हा ब्लॅक बॉक्स त्यातील माहितीचा डेटा डाऊनलोड करण्यासाठी अमेरिकेला पाठविण्यात येणार आहे. कारण तीव्र आगीमुळे काही ठिकाणी तो डॅमेज झाला असल्याने संपुर्ण डेटा डाऊनलोड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ब्लॅक बॉक्समधील २ रेकॉडरपैकी एका रेकॉडरमधील माहिती / डेटा डाऊनलोड करण्यात यश आले आहे. दुसऱ्या रेकॉडरमधील माहिती घेण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. त्यासाठी अमेरिकेतील अशा तंत्रज्ञान संस्थेची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तपास करणाऱ्या यंत्रणेचे तंत्रज्ञ ब्लॅक बॉक्स घेवून अमेरिकेला जाणार आहेत. अशाप्रकारच्या उच्च आणि विकसित तंत्रज्ञानाच्या आधारे ही माहिती डाऊनलोड करण्यात नक्की यश येईल’ असा विश्वास या यंत्रणेने व्यक्त केला आहे.

घातपाताची शक्यता : पवार – दरम्यान अपघात नव्हे तर घातपातच आहे अशा शंका उपस्थित करण्यात येत आहेत. अजितदादांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याची उत्तरे मिळालेली नाहीत. या पार्श्वभुमीवर डीडीसीआयएने प्राथमिक निष्कर्षात अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड आणि पायलटचा लैंडिंगबाबत चुकलेला अंदाज असे नमुद केले आहे. अर्थात याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. काही वृत्त संस्थांनी तपास यंत्रणांचा हवाला देत ही बातमी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular