28.2 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeKhedलोटे परिसरात दररोज होतेय शेकडो टन लाकडाची आयात

लोटे परिसरात दररोज होतेय शेकडो टन लाकडाची आयात

खेड तालुक्याच्या पूर्वेकडील गावातून मोठ्या प्रमाणात लाकूड येत आहे.

कारखान्यातील बॉयलर चालविण्यासाठी प्रमुख इंधन परवडत नसल्याचे कारण देत बहुतांश कंपन्या लाकडाचा वापर करत असून  लोटे औद्योगिक वसाहतीत दररोज  शेकडो टन लाकडाची आयात होत असल्याचे दिसून येत आहे. चिपळूण  तालुक्यातील वृक्षतोडीचा गाजावाजा होत असला तरी खेड तालुक्यातही अनेक ठिकाणी वृक्षतोड होत असल्याने तेथेही सीसीटीव्ही बसवण्याची गरज असल्याची चर्चा आहे. चिपळूणच्या काही गावातून वनविभागाने शेकडो टन लाकूड जप्त केले. अवैध लाकूडतोडीला आळा घालण्यासाठी काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसवले जात आहेत. मात्र, लोटे औद्योगिक वसाहतीत पुरवठा होणारे लाकूड खेड तालुक्याच्या पूर्वेकडील गावातून मोठ्या प्रमाणात येत आहे.

गुणदे, शेल्डी, भेलसई, आंबडस, केळणे, काडवली, मुसाड, पाली, वावे व या भागातील पंधरागाव विभाग तसेच कुळवंडी, बिजघर, खोपी, शिरगाव, तिसंगी, कुंभाड व या परिसरातील दुर्गम भागातून मोठ्या प्रमाणात वसाहतीत लाकडाची आयात होते. वनविभागाने नेमलेल्या भरारी पथकाने एकदा लोटे औद्योगिक वसाहतीत पाहणी करून खात्री करावी, निसर्गप्रेमी व पर्यावरणाचे संवर्धन करणाऱ्या संस्था किंवा जंगल वाचविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांनी इथले वास्तव भरारी पथकाच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी अपेक्षा केली जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular